Mass Shooting at Pretoria Township Bar Saam
देश विदेश

बारमध्ये ठो-ठो; तिघांचा अंदाधुंद गोळीबार, २५ जणांना गोळी लागली, ११ जणांचा मृत्यू

Mass Shooting at Pretoria Township Bar: दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियाजवळील बारमध्ये अंदाधुंद गोळीबार. २५ जण गंभीर जखमी. ११ जणांचा जागीच मृत्यू.

Bhagyashree Kamble

दक्षिण आफ्रिकेतील एका बारमध्ये गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रिटोरिया जवळील एका टाउनशिपमध्ये शनिवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. हल्लेखोरांनी बारमध्ये बसलेल्या लोकांवर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या भयंकर हल्ल्यात आतापर्यंत ३ मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिटोरियाच्या पश्चिमेकडील सोल्सव्हिल टाउनशिपमधीस विनापरवाना बारमध्ये हा हलला झाला. एकूण २५ जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, १४ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अचानक हल्ला झाला

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं की, आतापर्यंतच्या तपासात ३ बंदूकधारींनी हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हल्लेखोर अचानक बारमध्ये घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सध्या पोलिसांची अनेक पथके तीन संशयित हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यामागील आरोपींचा अद्याप समोर आलेला नाही. आरोपींना अटक केल्यानंतर आणि तपास केल्यानंतरच हल्ल्यामागील कारण स्पष्ट होईल. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Custard Recipe: नविन वर्षाची सुरुवात करा टेस्टी डिशने घरच्या घरी बनवा फ्रूट कस्टर्ड,वाचा रेसिपी

Dahi Mirchi Recipe : झणझणीत दही मिरची एकदा ट्राय तर करा, जेवताना दोन चपात्या जास्त खाल

Maharashtra Live News Update: मुंबई महानगरपालिकेचा महापौर हा महायुतीचा होईल

वारं फिरलं! सोडून गेलेल्यांचे पुन्हा फोन, उमेदवारी मिळणार का? राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं

डोंबिवलीत प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते…आता चॉकलेटी धूर? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT