Nawada Crime Saam TV
देश विदेश

बालकाची भीषण हत्या! अपहरण करुन डोळे काढले,मग अ‍ॅसिडने जाळून टाकले कारण...

वृत्तसंस्था

बिहारमधील नवादा (Nawada Bihar) येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका 8 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुलाची हत्या करणारे मारेकरी इतके भीषण होते की त्यांनी मुलाचे दोन्ही डोळे फोडले आणि त्याचा चेहरा अॅसिडने जाळला. मंगळवारी सकाळी गया जिल्ह्यात मुलाचा मृतदेह सापडला. येथे नीमचक बथनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका टेकडीजवळ लोकांनी मुलाचा मृतदेह पाहिला. स्थानिक लोकांनी मुलाचा मृतदेह पाहिल्यावर त्यांचाही आत्मा हादरला. बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेहातून दुर्गंधी येत असून सात दिवसांपूर्वीच हे कृत्य झाल्याचे समोर आले आहे. सुनील कुमार यांचा मुलगा अंशु कुमार असे या बालकाचे नाव आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुनील कुमार यांचा मुलगा अंशू कुमार असे निष्पाप मुलाचे नाव आहे. 8 फेब्रुवारीला अंशूच्या घराजवळ सायकल चालवत होता. त्यानंतर गुन्हेगारांनी त्याचे अपहरण केले. यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत तो न सापडल्याने मुलाच्या आजोबांनी पोलीस ठाण्यात ३ जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून खून

मुलाच्या आजोबांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून हे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. यानंतरही पोलिसांनी आरोपींना अटक न केल्याने ९ जानेवारी रोजी नातेवाईकांसह आजूबाजूच्या लोकांनी रास्ता रोको केला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत तीन नामांकित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांनी पीआर बाँडवर स्वाक्षरी करून तिघांची सुटका केली. यानंतर आता मुलाचा मृतदेह गयामध्ये सापडला आहे. पोलीस आता याप्रकरणी काहीही बोलण्याचे टाळत आहेत.

मृतदेह मिळाल्याची माहिती डीएसपींनी दिली

मृतदेह सापडल्याच्या वृत्तावर, अंशूचे मामा विजय यादव यांनी सांगितले की, त्यांना सदर डीएसपी उपेंद्र प्रसाद यांनी गयामध्ये एका मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली होती. मुलाचा शिरच्छेद करून त्याच्यावर अॅसिड ओतून त्याची हत्या करण्यात आली आहे. यानंतर आमचे कुटुंबीय येथून थेट गया येथे पोहोचले, तेव्हा मृतदेहाची ओळख अंशू म्हणून झाली, त्यांनी जमिनीच्या वादातून अंशूची हत्या झाल्याचे सांगितले. शहरातील आयटीआयजवळ राहणाऱ्या कमल नयन सिंग, मनोज सिंग आणि बबलू सिंग यांच्याविरुद्ध त्याच्या आजोबांनी एफआयआर दाखल केला होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक करून सोडून दिले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT