Crime news Saam tv
देश विदेश

Crime: मुलीचं अफेअर, संतप्त वडिलांनी बॉयफ्रेंडला बर्थडेच्या दिवशी संपवलं, धारदार शस्त्र्याने जीव घेतला

Honor Killing in Telangana: प्रेमसंबंधाची माहिती मिळताच मुलीच्या संतप्त वडिलांनी प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. कुऱ्हाडीने वार करून प्रियकराला संपवलं आहे.

Bhagyashree Kamble

प्रेमसंबंधाची माहिती मिळताच मुलीच्या संतप्त वडिलांनी प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. कुऱ्हाडीने वार करून प्रियकराला संपवलं आहे. ही धक्कादायक घटना तेलंगणातील पेद्दापल्ली जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव साई कुमार असे आहे. त्याचे गावातील एका १९ वर्षीय मुलीवर प्रेम जडले होते. दोघेही वेगवेगळ्या जातीतील होते. आपल्या मुलीचे दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळल्याचे लक्षाच येताच तिच्या पालकांना राग अनावर झाला. काही दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी कुमारला मुलीपासून दुर राहण्यास सांगितले. पण धमकी देऊनही जोडपे एकमेकांना भेटत राहिले.

पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी कुमारला धमकी दिली होती. परंतु, तरीही त्याने त्यांचे ऐकले नाही. गुरूवारी कुमारचा वाढदिवस होता. संतप्त वडिलांनी कुमारच्या हत्येचा कट रचला. त्यांनी कुऱ्हाडीने कुमारवर हल्ला केला. या हल्ल्यात कुमार गंभीर जखमी झाला. कुमारला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच चौकशी करून मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT