hong kong airport cargo plane crash latest updates : हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी एक दुर्दैवी अन् भयानक घटना घडली. एमिरेट्स एयरलाइनचं बोइंग 747 कार्गो विमान लँडिंगवेळी नियंत्रण सुटले अन् रनवेवरून थेट समुद्रात कोसळलं. कार्गो विमान लँडिंगवेळी विमानतळावरील एका वाहनाला धडकलं त्यानंतर हा अपघात झाला. या अपघातामध्ये आतापर्यत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विमानातील चार कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले. त्या सर्वांना उपचारासाठी रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, ही दुर्घटना पहाटे ३.४० मिनिटांनी झाली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार्गो विमानाने लँडिंगवेळी रनवेवरील पेट्रोलिंग वाहनाला जोरात धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की विमान समुद्रात गेलं अन् त्यानंतर काहीवेळात विमानही रनवे सोडून पाण्यात कोसळलं. विमानाची जोरदार धडक झाल्याचे समजताच विमानतळावर एकच गोंधळ उडाला. मदतकार्य तात्काळ पोहचले. विमानातील क्रू मेंबर्सला तात्काळ बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एकजण क्रू मेंबर्स असल्याचे समजतेय.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 च्या अंदाजानुसार, लँडिंगवेळी विमान ९० किमी प्रति तास या वेगात होतं. AirNavRadar द्वारा काढण्यात आलेल्या फोटोत विमानाचा काही भाग गायब असल्याचे दिसतेय. तर अर्धा भाग पाण्यात बुडताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान ३२ वर्षे जुने होते. हे विमान तुर्कीच्या AirACT एमीरेट्स द्वारे चालवले जातेय. हे कार्गो विमान दुबई अल मकतूम विमानतळावरून निघाले होते. या विमानात एकही प्रवासी नव्हता.
अपघातानंतर हाँगकाँग विमानतळ तातडीने बंद करण्यात आले अन् आपत्कालीन बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी पाण्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाचा उत्तरेकडील धावपट्टी बंद करण्यात आली आहे. सीपीएस यांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे आणि तांत्रिक तपासणीतून नेमके कारण स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.