Amit Shah Saam TV
देश विदेश

Amit Shah: सीमावादावर गृहमंत्र्यांची मध्यस्थी; दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सहा-सहा मंत्र्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.

Shivaji Kale

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याची माहिती अमित शाह यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाहीत तोपर्यंत कुणीही सीमाभागावर दावा करणार नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सहा-सहा मंत्र्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. दोन राज्यांमध्ये काही छोटे छोटे मुद्दे आहेत. ही समिती या मुद्द्यावर चर्चा करुन ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. (Latest Marathi News)

स्थानिक पातळीवरील प्रश्नांवरही दोन्ही बाजूंकडील कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी यामध्ये प्रवाशी, व्यापारी यांना त्रास होता कामा नये. यासाठी दोन्ही बाजूंनी आयपीएस अधिकारी नेमण्याची तयारी दाखवली आहे. (Amit Shah)

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद चिघळला त्यात फेक अकाऊंटवरुन ट्वीट करण्यात आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. वाद निर्माण करण्यासाठी जिथे फेक ट्विट्स करण्यात आले आहेत, तिथे गुन्हे दाखल केले जातील. तसेच ज्यांनी हे कारस्थान रचलं आहे त्यांना सर्वांसमोर आणलं जाईल, असंही अमित शाह यांनी म्हटलं.

मी दोन्ही राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करतो की याला राजकीय मुद्दा बनवू नये. राजकीय कार्यक्रम वेगळे असून शकतात मात्र जनतेच्या हिताच्या दृष्टीने याचं राजकारण करुन नये. जी कमिटी स्थापन केली आहे त्याचं काम करतील, तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची वाट पाहावी, असं अमित शाह यांनी यावेळी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT