नवी दिल्ली: कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार उपचार घेतल्यानंतर बरा होत असल्याचे दिसून आले असतानाच, एचआयव्ही एड्स (HIV) यासारख्या आजारावरही आता तज्ज्ञांनी उपाय शोधला आहे. तज्ज्ञांनी एका लशीची निर्मिती करण्यात यश मिळवलं असून, या लसीचा एक डोस घेतल्यानंतर एचआयव्ही विषाणूपासून मुक्तता होऊ शकते.
इस्रायलच्या तेल अवीव युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तयार केलेल्या या लशीचे प्रयोगशाळेतील चाचणीचा अहवाल खूपच 'पॉझिटिव्ह' आला आहे. वैज्ञानिकांनी शरीरातील टाइप बी व्हाइट ब्लड सेल्सच्या जीनमध्ये काही बदल केले. त्यांनी एचआयव्ही विषाणूच्या संसर्गाला रोखले. त्यामुळे एचआयव्ही-एड्ससारख्या गंभीर आजारावरही उपचार होणे शक्य आहे, अशी आशा निर्माण झाली आहे.
एआयव्ही-एड्स हा आजार पूर्णपणे बरा होईल असे उपचार अद्याप तरी नाहीत. मात्र, काही औषधांनी या आजाराचा प्रादूर्भाव रोखता येऊ शकतो आणि एचआयव्हीबाधित रुग्णाचे आयुष्य वाढू शकते. हा आजार एचआयव्ही म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशिएन्सी विषाणूपासून पसरतो. हा विषाणू शरीरातील इम्यून सिस्टमवर आघात करतो. जर त्यावर उपचार केले नाहीत तर एड्स होऊ शकतो.
एका अहवालातील आकडेवारीनुसार, सन २०२० मध्ये जगातील जवळपास ३.७ कोटी रुग्णांना या आजाराने ग्रासले होते. या आजारावर उपचार व्हावेत यासाठी डॉ. आदि बार्जेल यांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या एका पथकाने बी सेल्सचा वापर केला. बी सेल्सच्या जीनमध्ये काही बदल करून एचआयव्ही विषाणूच्या काही विशेष भागांच्या संपर्कात आणले. त्यामुळे काही बदल घडून आले. त्यानंतर तयार झालेल्या बी सेल्समुळे विषाणू कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले, असे एका वृत्तात म्हटले आहे.|
एचआयव्हीच नाही, तर कॅन्सरवरही परिणामकारक
हे संशोधन करणारे डॉ. बार्जेल यांनी सांगितले की, प्रयोगशाळेत ज्यावर हे उपचार करण्यात आले किंवा परीक्षण करण्यात आले, त्याचे चांगले रिपोर्ट्स पाहायला मिळाले. शरीरात अँटिबॉडीजची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. तसेच एचआयव्ही व्हायरस संपुष्टात आणण्यात यश मिळाले. याबाबतचा अभ्यास अहवाल नेचर मासिकात प्रकाशिक करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.