Savera Prakash  Saam TV
देश विदेश

Pakistan General Election 2024 : पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला निवडणुकीच्या रिंगणात, कोण आहेत डॉ. सवेरा प्रकाश?

Hindu Women Savera Prakash Contest Election in Pakistan : सवेरा प्रकाश असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे वडील ओमप्रकाश हे डॉक्टर आहेत. यासोबतच प्रकाश यांचे वडील 35 वर्षांपासून पीपीपीचे सक्रिय सदस्य आहेत.

प्रविण वाकचौरे

Pakistan Election News :

पाकिस्तानात 16 व्या नॅशनल असेंब्लीची निवडणूक नवीन वर्षात 8 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडणार आहेत. निवडणुकीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान एक हिंदू महिला चर्चेचा विषय ठरत आहे.

'डॉन'च्या वृत्तानुसार, यावेळी पाकिस्तानात एका हिंदू महिलेने पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सवेरा प्रकाश असे या महिलेचे नाव आहे. या महिलेचे वडील ओमप्रकाश हे डॉक्टर आहेत. यासोबतच प्रकाश यांचे वडील 35 वर्षांपासून पीपीपीचे सक्रिय सदस्य आहेत.बुनेर जिल्ह्यातील PK-25 जागेसाठी सवेरा प्रकाश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सवेरा यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मुलीने खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बुनेर जिल्ह्यातील पीके-25 सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुनेरचे स्थानिक नेते आणि कौमी वतन पार्टीचे सदस्य सलीम खान यांनी सांगितले की, या जागेवरून उमेदवारी दाखल करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, सवेराने 2022 मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. सवेरा प्रकाश पीपीपीच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीसही होत्या. निवडणूक जिंकल्यानंतर महिलांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे सवेरा यांनी सांगितलं.

पाकिस्तानमध्ये कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण आणि महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पीपीपीचे नेतृत्व त्यांच्या उमेदवारीला मान्यता देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारी रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि अनागोंदी सुधारण्याची त्याची इच्छा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Mehndi Design: श्रावणात हातावर उठून दिसतील सोप्या अन् आकर्षक मेंहदी डिझाईन्स

Shocking : अंत्ययात्रेत अंधाधुंद गोळीबार; ७ जणांचा जागीच मृत्यू , घटनास्थळी लोकांची धावाधाव

SCROLL FOR NEXT