Assam CM Himanta Biswa Sarma  saam tv
देश विदेश

Assam CM : आसामच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचा मोठा निर्णय, शपथविधी सोहळा कधी आणि किती वाजता?

Himanta Biswa Sarma to take oath as Assam CM : आसाममध्ये १२ मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी सोहळा होईल. तत्पूर्वी भाजपनं मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेतला. हिमंत बिसवा सरमा हे तिसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री होतील.

Nandkumar Joshi

आसामच्या मुख्यमंत्रिपदी अपेक्षेनुसार हिमंत बिसवा सरमा हे विराजमान होणार आहेत. भाजपच्या बैठकीत सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. (bjp announces himanta biswa sarma as assam cm) जे. पी. नड्डा यांनी हिमंत बिसवा सरमा यांच्या नावाची घोषणा केली. १२ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सरमा हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

भाजपने विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती. आसाम भाजपच्या विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात औपचारिकरित्या गटनेत्याची निवड करण्यात आली. हिमंत बिसवा सरमा यांनी ६ मे रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सध्या ते प्रभारी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आता भाजपचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ते सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.

शपथविधी सोहळा कधी ?

आसाममध्ये भाजपचं सरकार स्थापन होणार असून, मुख्यमंत्रिपदी हिमंत बिसवा सरमा हे शपथ घेतील. (Himanta Biswa Sarma to Take Oath as Assam Chief Minister for Third Time) हा सोहळा १२ मे रोजी सकाळी ११ वाजता गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेज फील्डवर आयोजित करण्यात येईल अशी शक्यता आहे. (assam chief minister oath ceremony date and time) या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय देशातील २२ राज्यांतील मुख्यमंत्र्यांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आसाममध्ये पहिल्यांदा २०१६ मध्ये भाजपची सत्ता आली होती. त्यावेळी सर्बानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये हिमंत बिसवा सरमा यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. आता २०२६ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा मोठा विजय मिळवला आहे.

भाजपला मोठं यश

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ४ मे रोजी झाली. भाजपच्या नेतृत्वात एनडीएला मोठा विजय मिळाला. विधानसभेच्या १२६ जागांपैकी भाजपला ८२ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसने १९ जागा जिंकल्या. तर बीओपीएफ या पक्षाला १० जागांवर विजय मिळाला. एआययूडीएफला फक्त २ जागाच जिंकता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoothening VS Keratin: केस खूप ड्राय आणि फ्रिझी झालेत? केसांसाठी कोणता ट्रीटमेंट फायदेशीर? जाणून घ्या

गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत आठ शेळ्या जळून खाक, शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Dog Bark Safety: 'या' ४ वस्तू जवळ ठेवा, कुत्रा कधीच हल्ला करणार नाही

कॉलेजमध्ये आता बायोमेट्रिक हजेरी, कॉलेज बुडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर वॉच

Jacqueline Fernandez: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; २०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित

SCROLL FOR NEXT