Nepal Helicopter Missing News
Nepal Helicopter Missing News  SAAM TV
देश विदेश

Helicopter Missing In Nepal : माउंट एव्हरेस्टजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता; उड्डाणानंतर अवघ्या १५ मिनिटांत संपर्क तुटला

Nandkumar Joshi

Nepal Helicopter Missing News : नेपाळमध्ये मनांग एअरचे हेलिकॉप्टर माउंट एव्हरेस्टनजीक बेपत्ता झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते. त्यातील पाच जण विदेशी होते.

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Airport) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ९ एन-एएमव्ही हेलिकॉप्टरने उड्डाण भरल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत संपर्क तुटला. या हेलिकॉप्टरने सकाळी पावणेदहाच्या सुमारास सोलुखुंबूमधील सुरकी येथून राजधानी काठमांडूसाठी उड्डाण भरले होते, असं वृत्त काठमांडू पोस्टनं नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या माहिती अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. (Nepal News)

'हिमालयन टाइम्स'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि इतर पाच जण होते. नेपाळच्या नागरी उड्डाण मंत्रालयानंही ट्विट करून माहिती दिली आहे. हेलिकॉप्टरमधून सहा जण प्रवास करत होते. त्यातील पाच नागरिक हे विदेशी होते. तर एक कॅप्टन होता. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरच्या शोधासाठी आणि बचावकार्यासाठी एल्टिट्युड एअर हेलिकॉप्टर काठमांडूहून पाचारण करण्यात आले आहे. (Breaking News In Marathi)

यावर्षी जानेवारीत नेपाळमध्ये एक विमान कोसळले होते. यात सर्वात मोठी जीवितहानी झाली होती. या भीषण अपघातात ७० जण ठार झाले होते.

येति एअरलाइन्सचे हे विमान काठमांडूहून पोखराकडे जात होते. सेती नदीनजीक दरीत हे विमान कोसळले होते. अपघातानंतर घटनास्थळाच्या परिसरात आगही लागली होती. त्यामुळे बचावकार्यासाठी पोहोचलेल्या पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा

Gauri Nalawade: माळरानी यावं गुलाबाचं फूल, गौरीच्या रुपाची पडली भूल!

Navi Mumbai Crime News: कंत्राटदाराने केली सहकाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Relationship Tips : डेट करणाऱ्या मुलीशी चॅटवर बोलताना 'ही' काळजी घ्या; प्रेमाचं नातं आणखी बहरेल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ट्राय करा 'हे' Home Remedies

SCROLL FOR NEXT