helicopter crashes in uttarakhands uttarkashi Saam Tv
देश विदेश

Helicopter Crashes: उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश, ५ भाविकांचा मृत्यू

Helicopter Crashes In Uttarkashi: ७ भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये कोसळले. या दुर्घटनेमध्ये ५ भाविकांचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झाले.

Priya More

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानी येथे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमध्ये ५ भाविकांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी उत्तरकाशीच्या गंगनानी वरून येत असलेले हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर एका प्रायव्हेट कंपनीचे होते. या हेलिकॉप्टरमधून ७ भाविक प्रवास करत होते. अचानक हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि जंगलात पडले. या दुर्घटनेमध्ये ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. तर इतर जणांचा शोध सुरू आहे.

सध्या उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी येत आहे. केदारनाथ, बदरीनाथ आणि गंगोत्री-यमुनोत्री या ठिकाणी दर्शनसाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. काही भाविक पायी चालत जात आहेत तर काही हेलिकॉप्टरने देवस्थानाच्या ठिकाणी जात आहेत.

हवामान खात्याने आज उत्तराखंडला इशारा दिला आहे. डेहराडून, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, टिहरी, पौरी, नैनिताल आणि चंपावत येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील नागरिकांनी आणि भाविकांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT