Helicopter Crash
Helicopter Crash Twitter/@ABCHearthrob
देश विदेश

तेलंगणातील नलगोंडामध्ये हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटचा मृत्यू ! (पहा Video)

वृत्तसंस्था

तेलंगणा: नलगोंडा जिल्ह्यात शनिवारी हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crash) झाले आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकासह दोन पायलटचा मृत्यू झाला आहे. कृष्णा नदीवरील (Krushna River) नागार्जुनसागर धरणाजवळील पेडदावुरा ब्लॉकमधील तुंगतुर्थी गावात हा अपघात झाला आहे. यावेळी स्फोटाचा मोठा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले होते.

तसेच पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हेलिकॉप्टरचे प्रशिक्षणार्थी पायलट हे हेलिकॉप्टर (Helicopter) उडवत होते. हे विमान हैद्राबाद (Hyderabad) येथील एका खासगी एव्हिएशन अकादमीचे होते. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांकडून मिळाली माहिती;

प्राथमिक तपासा दरम्यान, नालगोंडा पोलिसांनी माहिती दिली की, पेद्दावुरा मंडलातील तुंगतुर्थी गावात शेतजमिनीवर काम करणाऱ्या शेतकऱ्यांना हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे दिसले. त्याठिकाणाहून प्रचंड धूर निघत होता. माहितीच्या आधारे पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून त्यात महिला पायलटचा (Pilot) मृत्यू झाला आहे.

पोलिसांना संशय;

हेलिकॉप्टर उच्च तनावाच्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. हेलिकॉप्टर हैदराबादच्या फ्लायटेक एव्हिएशन अकादमीचे आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील नागार्जुनसागर येथे नालगोंडाच्या सीमेवर एक ऑपरेशनल इन्स्टिट्यूट आहे, त्याठिकाणाहून हे हेलिकॉप्टरने उड्डाण केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला

Today's Marathi News Live : सांगलीत कॉफी शॉप तोडफोड प्रकरणी १६ जण ताब्यात

Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, संशयित आरोपी बिभव कुमार घरातून गायब

Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

SCROLL FOR NEXT