धक्कादायक: बाळाला केले मृत घोषित! अंत्यविधीसाठी नेत असताना अचानक...

जिल्ह्यातील निलंगा शहरातील कुडुंबले हॉस्पिटल येथे अजबच प्रकार घडला आहे.
धक्कादायक: बाळाला केले मृत घोषित! अंत्यविधीला नेत असताना अचानक...
धक्कादायक: बाळाला केले मृत घोषित! अंत्यविधीला नेत असताना अचानक...दिपक क्षीरसागर

दिपक क्षीरसागर

लातुर: जिल्ह्यातील निलंगा शहरातील कुडुंबले हॉस्पिटल येथे अजबच प्रकार घडला आहे. बाळाचा जन्म होताच काही वेळात डॉक्टरांनी त्या बाळाला मृत आहे म्हणून घोषित केले. पण अचानक बाळ श्वास घेऊ लागले.

मृत बाळाला नातेवाइकांनी ज्यावेळी अंत्यविधीला घेऊन जात होते त्यावेळी बाळाचा श्वास सुरु आहे असल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या डॉक्टरांकडे बाळाची तपासणी केली असता ते बालक जिवंत असल्याचं निष्पन्न झालं.

धक्कादायक: बाळाला केले मृत घोषित! अंत्यविधीला नेत असताना अचानक...
Maratha Reservation: जे काही व्हायचे तो होवो, उपोषण करणारच - छत्रपती संभाजीराजे

सकाळी 11 वाजता लाबोटा येथील प्रणिता स्वप्निल गायकवाड नामक महिलेंनी बाळास जन्म दिला असता काही वेळ बाहेर श्वास घेत नसल्याचं लक्षात येताच डॉक्टरांनी बाळास विश्वास बंद आहे असं सांगितलं. यामुळे नातेवाईकांचा टोहा फुटला. यामधून बाळाचा अंत्य विधी करावा यासाठी सर्व नातेवाईक एकत्र जमले आणि अंत्यविधीला नेत असताना ते बाळ अचानकरीत्या श्वास घेण्यास सुरुवात केली.

हे देखील पहा-

त्यानंतर या हॉस्पिटलमध्ये बराच वेळ नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घालून घडलेला प्रकार हा निषेधार्ह असल्याचे सांगत जर वेळीच प्रशासनाच्यावतीने या हॉस्पिटल वरती कार्यवाही करण्यात नाही आली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नातेवाईकांकडून देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com