Helicopter Crash Saam Tv
देश विदेश

Helicopter Crash: टेकऑफ घेताच काही सेकंदात समुद्रात हेलिकॉप्टर कोसळलं, ७ जण करत होते प्रवास

Helicopter Crash in Andaman Sea: अंदमानच्या समुद्रामध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या हेलिकॉप्टरमधून ७ जण प्रवास करत होते. पायलटच्या एका निर्णयामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले.

Priya More

Summary -

  • टेकऑफ घेतल्यानंतर काही सेकंदातच हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले

  • अंदमानच्या समुद्रामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले

  • तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचे क्रॅश-लँडिंग करण्यात आले

  • पायलटच्या तत्परतेमुळे सातही प्रवाशांचे प्राण वाचले

झारखंडमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून सोमवारी ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच अंदमानमध्ये मंगळवारी सकाळी समुद्रात हेलिकॉप्टर कोसळले. पवन हंस कंपनीचे हेलिकॉप्टर टेकऑफ घेतल्यानंतर काही सेकंदातच समुद्रामध्ये कोसळले. या हेलिकॉप्टरमधून ७ जण प्रवास करत होते. या सर्व जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या हेलिकॉप्टरचे समुद्रात क्रॅश-लँडिंग करावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंदमानच्या समुद्रात घडली. पायलटच्या तत्परतेमुळे हेलिकॉप्टरमधील सर्वांचे प्राण वाचले. पायलटने हेलिकॉप्टरचे यशस्वीरित्या क्रॅश-लँडिंग केले. हेलिकॉप्टरमध्ये दोन क्रू मेंबर्ससह सात जण होते. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

हेलिकॉप्टर पोर्ट ब्लेअरवरून मायाबंदरला जात होते. उड्डाणानंतरच पायलटला हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा अंदाज आला. त्यामुळे त्याने हेलिकॉप्टरचे समुद्रात क्रॅश लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे हेलिकॉप्टरमधील सर्वांचे प्राण वाचले. पवन हंस कंपनीच्या प्रवक्ताने सांगितले की, ही घटना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. फक्त क्रू मेंबर्सला किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान, पवन हंस ही देशातील सर्वात मोठी सरकारी मालकीची हेलिकॉप्टर कंपनी आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरचा वापर दुर्गम भागात प्रवास करण्यासाठी केला जातो. अनेक प्रमुख राजकारणी या पवन हंस कंपनीच्या हेलिकॉप्टरचा वापर करतात. ही कंपनी १९८५ मध्ये सुरू करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT