नैनितालमधील मुसळधार पावसाचा फटका, नाशिकचे यात्रेकरू पुरपरीस्थितीत अडकले...(पहा व्हिडिओ) Saam Tv
देश विदेश

नैनितालमधील मुसळधार पावसाचा फटका, नाशिकचे यात्रेकरू पुरपरीस्थितीत अडकले...(पहा व्हिडिओ)

मागील २४ तासांपासून उत्तराखंड नैनीतालमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : मागील २४ तासांपासून उत्तराखंड नैनीतालमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नैनी तलावाच्या पाणी पातळीत इतिहासातले सर्व रेकॉर्ड तोडले आहेत, असे असतानाच नाशिक मधून नैनीतालला गेलेल्या पर्यटकांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. नाशिकचे २७ पर्यटक नैतिताल मध्ये अडकले आहेत.

नैनीताल मध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने त्याठिकाणी अनेक रस्ते बंद आहेत. परिणामी पर्यटकांना त्याठिकाणाहून निघणे अवघड झाले आहे. नाशिकचे २७ यात्रेकरु नैनितालला गेले होते. पण मागील ३० तासांपासून नैनिताल मध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे देशभरातले पर्यटक अडकून पडले आहेत. नाशिकचे पर्यटक देखील यामध्ये आहेत. त्यांनी नैनिताल मधील भीषण परिस्थितीचा आढावा नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला आहे.

पहा व्हिडिओ-

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीने नैनिताल प्रशासनाशी संपर्क साधला आहे. यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्याची नैनिताल प्रशासना कडून व्यवस्था करण्यात येत आहे. पर्यटकांची काळजी घेऊ, त्यांना लागेल ती मदत करु, असे नैनिताल प्रशासनाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे. आतापर्यंत नैनीताल मध्ये २४ तासांत सुमारे ५०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसामुळे, नैनी तलावाचे पाणी मंगळवारी सकाळी तल्लीतालमध्ये येथील वेस पार करून रोडवेज बसस्थानकासह डीएम कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले आहे, जिथून आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. नैनीताल मधील पर्यटकांना रस्त्याने प्रवास करता येत नाही. कारण पावसाच्या कहराने नानितालचा इतर भागाशी संपर्क तुटलेला आहे.

भूस्खलनामुळे, ढिगाऱ्यांमुळे काळढुंगी, हळदवानी, भवाळीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. नैनीतालला येणारे पर्यटक देखील मुसळधार पावसामुळे त्रस्त झाले आहेत. नैनीतालला भेट देण्यासाठी आलेले पर्यटक अचानक आलेल्या आपत्तीमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सर्व पर्यटकांना हॉटेलमध्ये राहण्यावाचून काही पर्याय नाही. यावेळी काही पर्यटक रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; पत्र आल्याने राजकीय गोटात खळबजनक

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Coffee and blood pressure: कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं? रोज 1 कप प्यायल्याने शरीरावर काय होतो परिणाम, वाचा...

Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश

Walking vs Squats : 10 स्क्वॉट्स की ३० मिनिटं चालणं, सर्वात जास्त परिणामकारक काय? नेमकं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT