Tragic Accident in Rajasthan Saam tv
देश विदेश

Tragic Accident : मुसळधार पावसाचा फटका, शाळेचं छत कोसळून मोठी दुर्घटना,६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Tragic Accident in Rajasthan : राजस्थानच्या पिपलोड गावात छत कोसळून मोठी दुर्घटना घडलीये. या घटनेत ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Rajasthan school roof collapse : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली आहे. मनोहर ठाणे विधानसभा क्षेत्रातील एका गावात मुसळधार पावसामुळे शाळेचं छत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ३० विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तर आतापर्यंत या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोड गावात ही दुर्घटना घडली आहे. शाळेत सकाळी प्रार्थना सुरु असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत या दुर्घटनत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर छत कोसळल्यानंतर सुरुवातीला शाळेतील ६० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले.त्यातील अनेकांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

शाळेच्या भवनचा एक मोठा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले गेले. स्थानिकांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जेसीबी मशीनच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचं काम सुरु केलं. या घटनेनंतर बचत पथक देखील घटनास्थळी पोहोचलं.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सातवीचे विद्यार्थी होते. इयत्ता सातवीच्या वर्गात ७० विद्यार्थी होते. त्यातील १५ जण ढिगाऱ्याखाली अडकले. तर आताही रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी सांगितलं की, 'प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. शिक्षण मंत्री यांनी ३ विद्यार्थ्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT