Liqour Party in Tehsil Ofc Saam Tv News
देश विदेश

तहसील कार्यालयात दारू पार्टी; हातात दारूचा ग्लास अन् गाण्यावर ठुमके, VIDEO व्हायरल

Liqour Party Inside Office: अंबालाच्या तहसील कार्यालयात दारू पिऊन काही लोकांनी पंजाबी गाण्यावर नाच केला. टेबलावर दारूच्या बाटल्या, भजी, सिगारेटही स्पष्टपणे दिसून आल्या.

Bhagyashree Kamble

  • अंबालाच्या तहसील कार्यालयात दारू पिऊन काही लोकांनी पंजाबी गाण्यावर नाच केला.

  • टेबलावर दारूच्या बाटल्या, भजी, सिगारेटही स्पष्टपणे दिसून आल्या.

  • संबंधित व्यक्ती सरकारी कर्मचारी नसून पूर्वीही तक्रारी होत्या.

  • स्कॅनर लावूनही बाहेरचे लोक कार्यालयात कसे शिरले? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

हरियाणातील अंबालाच्या तहसील कार्यालय संकुलातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक दारू पिऊन पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अंबालातील छावनी स्थित मिनी सचिवालयातील तहसील कार्यालय संकुलात दारू पिऊन काही लोकांनी धिंगाणा घातला. या व्हायरल व्हिडिओमध्ये २ लोक पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहेत. तर, तिसरा व्यक्ती टेबलवर दारूचा ग्लास तयार करीत आहे. टेबलावर देशी दारूचे बॉटल, भजी, सिगारेट देखील स्पष्टपणे दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये नाचत असलेली व्यक्ती सरकारी कर्मचारी नसल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्तीविरोधात यापूर्वीही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २००५ साली माजी नगरसेवक ओंकार नाथी यांनी आमदार आणि २०२१ साली तत्कालीन गृहमंत्री अनिल विज यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर देखील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात आलेली नाही.

ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला, त्या कार्यालयात नुकतेच एक स्कॅनर बसवण्यात आले आहे. जेणेकरून फक्त अधिकृत कर्मचारी प्रवेश करू शकतील. अशावेळी इतर व्यक्तींनी तिथे प्रवेश केलाच कसा? उघडपणे दारू पार्टी झाली कशी? हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : परदेशात नोकरीच्या खोट्या प्रलोभनाचा पर्दाफाश; मनसेच्या हस्तक्षेपाने दोन तरुणांची सुटका

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर ५००० रुपयांनी वाढले; वाचा आजचे भाव

Ganpati Movies : गणेशोत्सवात मनोरंजनाची मेजवानी; घरबसल्या पाहा ८ 'गणपती'चे चित्रपट, पाहा यादी

खडसेंच्या जावयाचे पाय आणखी खोलात, आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो समोर, ८ महिलांचा दावा

SCROLL FOR NEXT