Crime News  Saam tv
देश विदेश

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Faridabad Crime: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये तरुणाने आत्महत्या केली. एआयद्वारे या तरुणाचे आणि त्याच्या बहिणीचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ तयार करून त्याला ब्लॅकमेल केले जात होते. या त्रासातून त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Priya More

हरियाणाच्या फरिदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फरिदाबादमधील बसेलवा कॉलनीमध्ये एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्ये करत आयुष्य संपवले. एआयच्या माध्यमातून हा तरुण आणि त्याच्या बहिणीचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटो तयार करण्यात आले होते. या व्हिडीओद्वारे त्याला ब्लॅकमेलिंग केले जात होते. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तो आपल्या कुटु्ंबीयांसोबत बसेलवा कॉलनीमध्ये राहत होता. आत्महत्या केलेला तरुण राहुलच्या वडिलांनी सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी माझ्या मुलाचा फोन हॅक करण्यात आला होता. फोन हॅक केल्यानंतर त्यांनी एआयच्या माध्यमातून राहुल आणि त्याच्या बहिणीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ तयार केले होते. या व्हिडीओ आणि फोटोद्वारे ते माझ्या मुलाला बॅकमेल करत होते. हे व्हिडीओ व्हॉट्सअपवर टाकून राहुलकडे आरोपींनी २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकेल अशी आरोपी त्याला धमकी देत होते.

याच त्रासाला कंटाळून राहुलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उपचलले. राहुलचे वागणे गेल्या दोन आठवड्यांपासून बदलले होते. तो व्यवस्थित जेवण करत नव्हता. कुणाशी काहीही बोलत नव्हता. सतत आपल्या खोलीमध्ये शांत बसून राहायचा. त्याच्या कुटुंबीयांना हे माहिती नव्हते की तो इतक्या मोठ्या अडचणीत अडकला आहे. शनिवारी संध्याकाळी राहुलने आपल्या खोलीमध्येच सल्फाच्या गोळ्या खालल्या. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

राहुलच्या वडिलांनी जेव्हा त्याचा मोबाईल चेक केला तेव्हा त्यांना तो चिंतेत का होता यामागचे कारण कळाले. ते म्हणाले की, जेव्हा मी माझ्या मुलाचा मोबाईल फोन तपासला तेव्हा मला साहिल नावाच्या तरुणाशी दीर्घ संभाषण झाल्याचे आढळले. चॅटमध्ये साहिलने राहुलचे नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवले होते आणि पैशांची मागणी केली होती. शेवटच्या संभाषणात त्याने राहुलला धमकी दिली की जर त्याने पैसे दिले नाहीत तर तो सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. शिवाय, चॅटमध्ये साहिलने राहुलला आत्महत्या करण्यास प्रोत्साहित करणारे शब्द लिहिले होते. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली असून पोलिस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT