Haryana CM Nayab Singh Saini 48 BJP MLAs meeting PM Modi saam tv
देश विदेश

मोठी राजकीय घडामोड! 48 आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली; पीएम मोदींची घेणार भेट,तर्कवितर्कांना उधाण

CM Meet PM With 48 MLAs: मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर संध्याकाळी आमदारांना घेऊन दिल्ली गाठलीय. सोशल मीडियावर आपल्या सरकारच्या कारभाराची रुपरेषा मांडल्यानंतर मुख्यमंत्री थेट दिल्ली दौरा आखला. यामुळे राज्यातील राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

  • हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी 48 भाजप आमदारांसह दिल्लीला पोहोचले.

  • बैठक पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी होत आहे.

  • हरियाणातील संघटनात्मक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा होऊ शकते.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या राजीमान्यासाठी देशभरात आंदोलने चालू असतानाच एक मोठी राजकीय घडामोड घडलीय. आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतांची चोरी करून भाजपला वेगवेगळ्या राज्यात निवडणूक जिंकवण्यात मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याचदरम्यान भाजपशासित हरियाणा राज्यात मोठी घडामोड घडतेय. येथील ४८ आमदारांसह मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी दिल्ली गाठलीय.

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी ४८ आमदारांसह शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थानी मुख्यमंत्री नायब सिंग सैन पोहोचलेत. मुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्ली दौरा का काढला आणि पंतप्रधान मोदींची का भेट घेणार आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. इतकेच नाहीतर आमदारांनाही दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप माहीत नसल्याचं म्हटलं जातंय.

पंतप्रधान आमदारांच्या कामाचा आढावा घेणार?

याबाबत भाजपचे आमदार विपुल गोयल यांनी सांगितलं की, "पंतप्रधानांना भेटण्याच्या शक्यतेमुळे एक प्रकारची उत्सुकता आणि आनंद वाटतोय. हरियाणा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. तिथे गेल्यावरच आम्हाला त्यातील कार्यसूची (अजेंडा) समजेल"त्यांनी पुढे सांगितले, "स्वाभाविकच, आम्ही पंतप्रंतधानांची भेट घेत आहोत, तेव्हा ते कदाचित विचारतील की, 'आम्ही तुमची मंत्री आणि आमदार म्हणून नियुक्ती केली.

मग राज्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी तुम्ही नक्की काय केले आहे?' आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. बैठकीच्या मुद्दा हा SIR चा आहे की अन्य कोणताही विषय, त्याबद्दल आम्ही आत्ताच निश्चितपणे काही सांगू शकत नाही. पण पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी उत्साह आणि ऊर्जा मात्र नक्कीच उच्च पातळीवर आहे."

आमदार योगेंद्र राणा काय म्हणाले?

याच भावना व्यक्त करताना भाजपचे आमदार योगेंद्र राणा म्हणाले, "...आम्ही पंतप्रधानांची भेट घेणार आहोत आणि हरियाणातील ४८ आमदारांना त्यांना भेटण्याची संधी मिळत आहे. ही आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाणार आहोत." भाजपचे आमदार कृष्ण अहलावत यांनीही यात सहभाग घेत म्हटले, "त्यांनी (पंतप्रधान मोदींनी) आम्हाला पहिल्यांदाच बोलावले आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून काहीतरी चांगले शिकून आणि आमचे स्वतःचे काही विचार मांडून आम्ही परत येऊ."

दरम्यान, आजच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 'एक्स' (X) वर आपल्या सरकारची दूरदृष्टी आणि तक्रार निवारण यंत्रणेची रूपरेषा मांडली. राज्याच्या प्रशासन पद्धतीवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री सैनी यांनी पोस्टमध्ये म्हणाले की, " राज्यातील कुटुंबांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती गोळा करणे, त्यावर उपाय शोधणे आणि त्यानंतर नागरिकांकडून त्याबाबतची खातरजमा करून घेणे. जोपर्यंत नागरिक समाधानी होत नाहीत, तोपर्यंत तक्रार निवारण पूर्ण झाले असे मानले जाणार नाही.", अशी सरकारची रणनीती असणार आहे.

थेट देखरेखीवर भर देत त्यांनी पुढे लिहिले, "नागरिकांच्या समस्यांची माहिती मिळवण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आमच्याकडे एक समांतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यावर मी स्वतः देखरेख ठेवतो. या यंत्रणेद्वारे, प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती काय आहे. नागरिकांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, याबाबत आम्हाला सतत अद्ययावत माहिती घेतोय असं मुख्यमंत्री पोस्टमध्ये म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade lip balm : महागडे लिप बाम कशाला? घरच्या घरी बीटपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ अन् गुलाबी

Constipation : सकाळी पोट साफ होत नाही? ३ पदार्थ कोमट पाण्यात मिसळून प्या, रोजचा त्रास होईल बंद

शेळीपालनाचा व्यवसाय करायचाय, पण शेड नाहीये? शासनाकडून किती मिळतं अनुदान?

Work Life Balance : नोकरी अन् घर सांभाळताना दमछाक होतेय? वर्किंग मदर्सनी वापरा 'ही' सोपी ट्रिक; ताण होईल गायब

Maharashtra News Live Update: बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास मालेगाव संगमेश्वर येथे बेड्या

SCROLL FOR NEXT