Pitbull Dog Attack Saam Tv
देश विदेश

Pitbull Dog Attack : बापरे बाप! पिटबुलकडून तरुणाच्या ‘प्रायव्हेट पार्ट’ला चावा; असा वाचवला जीव

एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने एक युवकावर हल्ला केला. 30 वर्षीय युवकाचा जीव धोक्यात आला, कारण कुत्र्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला.

Shivani Tichkule

Haryana Pitbull Dog Attack News : आजकाल कुत्रा पाळणे ही लोकांची फॅशन बनली आहे. पण तो कसा सांभाळायचा हेही कळायला हवं. आजकाल लोक कुत्र्यांना तो काहीही करणार नाही या विश्वासाने घरात मोकळे सोडतात. आजकाल कोणाच्याही घरी बघा, एक ना दुसरा पाळीव कुत्रा नेहमी दिसतो. खेड्यापाड्यात त्याचे प्रमाण खूपच कमी असले तरी शहरांमध्ये त्याचा ट्रेंड शिगेला पोहोचला आहे. (Latest Marathi News)

काहींना पिटबुल, काहींना लॅब्राडोर तर काहींना जर्मन शेफर्ड हा कुत्रा पाळायला आवडतो. सामान्यतः असे दिसून येते की लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना आपल्या मुलांप्रमाणे ठेवतात, त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्या बदल्यात कुत्रे देखील त्यांच्याशी समान वागणूक देतात, परंतु कधीकधी त्यांचे आक्रमक रूप देखील दिसून येते. अशीच एक घटना हरियाणातील (Haryana) करनालमध्ये घडली आहे.

यात एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने एक युवकावर हल्ला केला. 30 वर्षीय युवकाचा जीव धोक्यात आला, कारण कुत्र्याने (Dog) त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला होता. युवकाने आपला जीव वाचवण्यासाठी शेवटी कुत्र्याच्या तोंडात कापडाचा बोळा घातला. या युवकची प्रकृतीचिंताजनक आहे. त्याचवेळी संतप्त लोकांनी पिटबुलला (Pitbull) काठीने बेदम मारहाण केली. 

कर्नालमधील बिजना येथील रहिवासी करण गुरुवारी सकाळी आपल्या शेतात काम करत होता. त्याच्या शेतात मशीनखाली एक पिटबुल जातीचा कुत्रा बसलेला होता. करण मशीनजवळ जाताच कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. खूप प्रयत्न करूनही पिटबुलने त्या तरुणाला सोडले नाही तेव्हा त्याने कुत्र्याच्या तोंडात शेजारी पडलेले कापड टाकून त्याचा जीव वाचवला आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर स्वतःची सुटका झाली. मात्र तोपर्यंत तरुण गंभीर जखमी झाला होता.

रुग्णालयात दाखल तरुण

तरुणाचा आरडाओरडा आजूबाजूच्या लोकांना ऐकू येताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत तरुणाला तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीही हल्ला झाला होता

गेल्या आठवडाभरापासून हा कुत्रा गावात फिरत असल्याचे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले.  दोन दिवसांपूर्वी देखील या कुत्र्याने एका व्यक्तीवर हल्ला केला होता. गावकरी घराबाहेर पडायला घाबरत होते. यावर सर्व गावकऱ्यांनी मिळून निर्णय घेत कुत्र्याला काठीने बेदम मारहाण केली.

या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. जेणेकरून कुत्र्याच्या मालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. माहिती मिळताच पोलिसांनी कर्नाल येथील कल्पना चावला मेडिकल कॉलेज गाठलं, तिथे जखमी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले. पोलीस (Police) याप्रकरणात आता कुत्र्याच्या मालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT