faridabad firing  Saam tv
देश विदेश

थराररक! शांतपणे एका बाजूला उभा राहिला, अचानक खिशातून बंदूक काढली अन् धाडधाड विद्यार्थिनीवर गोळ्या झाडल्या, VIDEO

faridabad firing news : तरुणीने बोलणं बंद केलं. त्यानंतर संतापलेल्या तरुणाने तिच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

फरीदाबादमध्ये दिवसाढवळ्या विद्यार्थिनीवर गोळीबार

आरोपी तरुणाने तरुणीला जवळून गोळ्या झाडल्या

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैद झाली आहे

गोळीबारानंतर आरोपी फरार, पोलिसांकडून पिस्तूल जप्त

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये दिवसाढवळ्या धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने बारावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून बंदूकीतून गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी संपूर्ण प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या गोळीबारात विद्यार्थिनी जखमी झाली आहे.

बारावीत शिकणारी विद्यार्थिनी ग्रंथालयातून घरी निघाली होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या तरुणाने विद्यार्थिनीवर गोळीबार केला. या गोळीबारात तरुणी जखमी झाली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मुलगा दुचाकीजवळ वाट पाहत होता. त्याचवेळी एक मुलगी मैत्रिणीसोबत फोनवर बोलत चालताना दिसत आहे. त्याचवेळी एक मुलगा अचानक समोर आला. तरुणीवर फार जवळून गोळीबार केला. गोळीबारानंतर रस्त्यावर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना या गोळीबाराविषयी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता माहिती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी ही तरुणाला गेल्या एका वर्षांपासून ओळखत आहे. दोघे ग्रंथालयात एकत्र अभ्यास करायचे. मागील १५ दिवसांपासून दोघांनी बोलणं बंद केलं होतं. त्यामुळे तरुण नाराज होता. तरुणीने तरुणाकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु सोमवारी तरुणाने थेट जीवे मारण्यासाठी गोळीबार केला'

'सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, तरुणाने तरुणीच्या जवळ जाऊन गोळीबार केला. मात्र, बंदूकीची गोळी तरुणीच्या डाव्या हाताच्या खांद्याला गोळी लागली. या गोळीबारात तरुणी जखमी झाली. गोळीबारानंतर तरुण पिस्तूल फेकून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी पिस्तूल जप्त केलं आहे. तरुणीच्या विधानावर सिटी बल्लभगड पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत हृदयद्रावक घटना! 8 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाला, शोधमोहीम सुरू|VIDEO

Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT