Haryana politics Saam tv
देश विदेश

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

Haryana Election Exit Poll Result update : हरियाणात मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली आहे.

Vishal Gangurde

हरियाणा : हरियाणात शनिवारी निवडणुकीची धामधूम संपली आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजपचं टेन्शन वाढलं आहे. तर या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाला फटका बसल्याचे दिसत आहे. एका एक्झिट पोलच्या आकेडवारीत काँग्रेस ५० पार जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला केवळ ०-१ जागा दाखवण्यात येत आहे. हरियाणात एकूण ९० विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली.

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार, भाजप १५-२९ जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काँग्रेसला ४४-५४ जागा दाखवण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्ष ०-१ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर अन्य पक्ष ४-९ जागा जिंकू शकतात. या एक्स्झिट पोलने भाजपसहित आम आदमी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे.

रिपब्लिक वर्ल्डच्या मॅट्रिज एक्झिट पोलनुसार, हरियाणात काँग्रेस ५५-६२ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर भाजप फक्त १८-२४ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आयएनएलडी म्हणजे नॅशनल लोकदलाला फक्त ३ ते ६ जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर अन्य पक्षांना २ ते ५ जागा दाखवण्यात आल्या आहेत.

२०१९ साली भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत ४० जागा जिंकून बाजी मारली होती. तर भाजप बहुमतापासून फक्त ५ जागा कमी मिळाल्याने दूर होता. त्यानंतर भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वात जननायक जनता पार्टीसोबत हातमिळवणी करून सरकारची स्थापना केली होती. २०१९ साली काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या होत्या. पुढे भाजप आणि जेजेपीची युती तुटल्याने दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं सरकारचा संसार अर्ध्यात मोडला होता.

दरम्यान, हरियाणाच्या ९० विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडलं. हरियाणात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, हरियाणात ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT