Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

जोडीदाराला आज सौख्य मागाल आणि देव सुख तुमच्या पदरात टाकणार आहे. एकमेकांसाठी आनंदी असणारा आजचा दिवस आहे.

वृषभ

कामाच्या ठिकाणी धावपळ असेल. खाण्यामुळे होणारे आजार होतील.आज खाण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

कला, मनोरंजनामध्ये दिवस चांगला जाणार आहे. प्रेमामध्ये विशेष यश प्राप्ती दिसते आहे.

कर्क

घरी नवीन वस्तूंची खरेदी होणार आहे. ज्येष्ठांचे विशेष आशीर्वाद राहणार आहे.

सिंह

छोटे प्रवास घडणार आहेत. प्रवासातून आपली नाती आणि भावंडे जवळ येणार आहे. अचानक हाती पैसा मिळणार आहे.

कन्या

घरी गोडधोडाचा बेत होणार आहे. कौटुंबिक सुख चांगलं राहणार आहे. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

तुळ

व्यक्तिमत्त्वाला नवीन झळाळी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. पती-पत्नीचे संबंध सुधारतील.

वृश्चिक

मोठ्या प्रवासाचे योग आहेत. तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. मनस्ताप वाढवून घेऊ नका.

धनु

मैत्रीपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित होणार आहेत. घरगुती स्नेहभोजनाचे आज योग आहेत.

मकर

राजकारणामध्ये यश आहे. समाजकारणामध्ये मान मिळणार आहे. कामाशी निगडित अधिक बोनस किंवा फायदा मिळणार आहेत.

कुंभ

दिवसाची सुरुवात आनंदाने आणि शेवट सुद्धा सुखाचा होईल. सामाजिक कामकाजात सन्मन मिळू शकतो.

मीन

धावपळ आणि दगदगीचा आज दिवस आहे. चुकीच्या गोष्टींकडे कल ठेवू नका.