Haryana Crime News Saam Tv
देश विदेश

दुर्देवी! हरियाणातील अंबाला येथे एकाच कुटुंबातील ६ जणांनी केली आत्महत्या

ही घटना हरियाणातील अंबाला येथील बलाना गावातील आहे.

साम वृत्तसंथा

चंदीगड : हरियाणातील (Haryana) अंबाला येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृत्यूचे (Death) कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरातून एक सुसाईड नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अलीकडेच जम्मूमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. तिथे दोन वेगवेगळ्या घरात एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह सापडले होते.

'दोन मुलांसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. क्राईम (Crime) टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती अंबालाचे डीएसपी जोगिंदर शर्मा यांनी दिली.

ही घटना बलाना गावातील आहे. संगत राम, महिंद्र कौर (पत्नी), सुखविंदर सिंग (मुलगा), रीना (सुखविंदरची पत्नी) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय आशु आणि जस्सी या अल्पवयीन मुलींचाही मृतांमध्ये समावेश आहे. सुखविंदरने आत्महत्या करण्यापूर्वी कुटुंबाला विष पाजल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तो एका खासगी कंपनीत कामाला होता. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मिरमध्ये अशीच घटना घडली

नूर-उल-हबीब, सज्जाद अहमद मगरे, सकिना बेगम आणि त्यांची मुलगी नसीमा अख्तर हे सिध्रा येथील पॉश भागात असलेल्या तवी विहारमध्ये मृतावस्थेत आढळले. यावेळी रुबिना बानो आणि तिचा भाऊ जफर सलीम यांचे मृतदेह जवळच्या घरात आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जम्मूचे एसएसपी चंदन कोहली यांनी सांगितले की, घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT