Mumbai: उध्दव ठाकरेंना गणेशोत्सवात शिंदे गट मोठा झटका देण्याच्या प्रयत्नात; कार्यकर्ते फोडण्यासाठी टाकला हा डाव

Ganeshotsav 2022 Latest News: या गणेशोत्सवाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे.
Ganeshotsav 2022 Political News
Ganeshotsav 2022 Political NewsSaam TV

रुपाली बडवे

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट अशा दोन भागात शिवसेना विभागली गेली. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अशात आता एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या गटातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या ३१ ऑगस्टपासून राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2022) गणेशोत्सव मंडळांना शिंदे गटाकडून लाखोंच्या जाहिराती देण्यात येणार आहे. जाहिरातींच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचा शिंदे गटाचा हा नवा डाव आहे. उद्धव ठाकरेंचा गड असलेल्या भागातील गणेश मंडळाना विविध माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न शिंदे गटातील नेते करत आहेत. या मंडळांना जाहिराती देण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी शिंदे गटाची आहे. या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांकडूनही विविध जाहिराती गणेश मंडळांना देण्यात येणार आहे. (Ganeshotsav 2022 Latest News)

Ganeshotsav 2022 Political News
Shridi : साईबाबा संस्थानची आज बैठक; शेतकरी, व्यवसायिकांसह भाविकांचं निर्णयावर लक्ष

याचा परिणाम म्हणून विविध गणेशोत्सव मंडळ आपल्या देखाव्याजवळ आणि मंडपाच्या परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटातील मंत्री, खासदार, आमदार याचे बॅनर्स लावू शकतात. ज्यामुळे जनतेमध्ये एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटालीत आमदारांची आणखी प्रसिद्धी होऊन त्याचा फायदा आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नक्की कुणाची आणि खरी शिवसेना कोणती याबाबत दाखल झालेल्या याचिकेच्या दृष्टीने जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com