Haryana Assembly Election 2024, Aam Aadmi Party 4th Candidate List Saam Tv
देश विदेश

Haryana Assembly Election : विनेश फोगट विरुद्ध WWE रेसलर मैदानात; आपची चौथी यादी जाहीर, जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी

Aam Aadmi Party 4th Candidate List: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये आपने कोणाला कुठून संधी दिली आहे, हे जाणून घेऊ...

Satish Kengar

Haryana Assembly Election 2024, Aam Aadmi Party 4th Candidate List:

हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत आम आदमी पक्षाने एकूण 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आपने आतापर्यंत हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 61 उमेदवार जाहीर केले आहेत.

आपल्या चौथी यादीत आपने काँग्रेस आणि भाजपविरुद्ध मजबूत उमेदवार दिले आहेत. आपने हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्याविरोधात लाडवा मतदारसंघातून जोगा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवरून काँग्रेसने मेवा सिंह यांना तिकीट दिलं आहे. तर विनेश फोगट या जुलानामधून निवडणूक लढवत आहे. आम आदमी पक्षाचे त्यांच्याविरोधात WWE रेसलर कविता दलाल यांना रिंगणात उतरवलं आहे. तसेच आपने निशांत आनंद यांना गुरुग्राममधून उमेदवारी दिली आहे.

कोणाला कुठून देण्यात आलं तिकीट?

आम आदमी पक्षाने अंबाला कँटमधून राज कौर गिल, यमुनानगरमधून ललित त्यागी, कैथलमधून सतबीर सिंग, कर्नालमधून सुनील बिंदल, पानिपत ग्रामीणमधून सुखबीर मलिक, गणौरमधून सरोज बाला राठी, सोनीपतमधून देवेंद्र सिंग, गोहानामधून शिवकुमार रंगीला, आणि शिवकुमार रंगीला यांना उमेदवारी दिली आहे. बडोद्यामधून संदीप मलिक, सफिदोमधून निशा देशवाल, तोहानामधून सुखविंदर सिंग गिल, कालानवलीतून जसदेव निक्का, सिरसामधून शाम मेहता यांना उमेदवारी दिली आहे.

तसेच आम आदमी पक्षाच्या इतर उमेदवारांमध्ये उकलानामधून नरेंद्र उकलाना, नारनौडमधून राजीव पाली, हांसीमधून राजेंद्र सोरखी, हिसारमधून संजय सत्रोदिया आणि बदलीमधून हॅपी लोचाब यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, आम आदमी पक्ष हरियाणा विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करून लढण्याचा प्रयत्न करत होते.. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीची घोषणा करण्यासाठी 12 सप्टेंबरची तारीख दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी आप पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT