PM Modi and Rahul Gandhi  Saam Tv
देश विदेश

Assembly Election 2024 : हरियाणात काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजपची पिछेहाट; जम्मू-काश्मीरमध्ये कोण आघाडीवर?

Assembly Election Result 2024 : जम्मू काश्मीर आणि हरियाणात मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्याच टप्प्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून भाजपची पिछेहाट झाली आहे.

Satish Daud

Jammu-Kashmir and haryana Assembly Election Results 2024 Update:  संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे प्राथामिक कल हाती आले असून सुरुवातीलाच काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तर भाजपची पिछेहाट होताना दिसून येत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, हरियाणामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे.

हरियाणात काँग्रेस सध्या ४६ जागांवर आघाडीवर असून भाजपने २० जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे हरियाणात १० वर्षानंतर सत्तांतर होणार का? याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे. दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये देखील काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपने २१, काँग्रेस २८ आणि इतर पक्षांनी १० जागांवर आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर पहिल्यांदाच देशातील दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभांची प्रत्येकी ९० सदस्यसंख्या आहे. मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दोन्ही राज्यांचं दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून दोन्हीकडे तिहेरी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

विजयानंतर मोदींना जिलेबी पाठवणार

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये सुरुवातीलाच जोरदार मुसंडी मारल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत, असं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं आहे. आज दिवसभर आम्हाला लाडू आणि जिलेबी खायला मिळेल. विजयानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिलेबी पाठवणार, असा टोलाही पवन खेडा यांनी हाणला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये घडामोडींना वेग

जम्मू काश्मीरमध्ये भाजप, काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स अशी चौरंगी लढत होत आहे. एक्झिट पोलमध्ये राज्यात त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. यामुळे काही स्थानिक पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एक मोठं विधान केलं आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महबूबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत युती करण्यास तयार असल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT