Midnight Tragedy in Haryanas Sonipat Saam
देश विदेश

सत्संगवरून येताना भयंकर घडलं, चारचाकी अन् ट्रॅक्टरचा अपघात, पती- पत्नी अन् चिमुकलीचा मृत्यू

Midnight Tragedy in Haryanas Sonipat: हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात मध्यरात्री भीषण अपघात घडला. ट्रॅक्टर ट्रोली आणि चारचाकीची समोरासमोर धडक. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • मध्यरात्री हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात घडला भीषण अपघात.

  • ट्रॅक्टर-ट्रोली आणि चारचाकीची एकमेकांना धडक.

  • अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार.

हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील गोहाना सोनीपत रोडवरील खेडी दमकन बायपासवर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रॅक्टर-ट्रोली आणि चारचाकी गाडीचा समोरासमोर टक्कर झाली. मध्य रात्री घडलेल्या या अपघातात दांपत्य आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर, तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, भिवानी येथील सत्संग कार्यक्रमात सहभाग होऊन कुटुंब घरी जात होते. परतत असताना अपघात घडला. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अशोक, त्याची पत्नी आशु आणि त्यांची मुलगी चेष्टा असे अपघाती मृत झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भिवानी येथील सत्संग कार्यक्रमात सहभागी होऊन हे कुटुंब त्यांच्या गावी बिधलच्या दिशेनं रवाना झाले. मध्य रात्रीच्या सुमारास कुटुंब चारचाकीतून निघाले. दरम्यान, गाडी खेडी दमकन बायपासवर पोहोचली. तेव्हा गवतानं भरलेली ट्रॅक्टर ट्रोली अचानक चारचाकीच्या बाजूला धडकली.

यामुळे दोन्ही वाहनांमध्ये जोरदार टक्कर झाली. अशोक त्याच्या पत्नी आणि मुलीसह पुढच्या सीटवर बसला होता. तर, चारचाकीच्या मागच्या सीटवर सरिता, त्यांची मुलगी सृष्टी आणि गावातील मुलगा विरेंद्र बसला होता. या तिघांनी अशोककडे लिफ्ट मागितली होती. धडक इतकी जोरदार होती ती, चारचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला.

चारचाकीच्या समोर बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, मागे बसलेले सरिता, सृष्टी आणि वीरेंद्र हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. प्राथमिक तपासात ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT