Harbhajan Singh BJP Saam
देश विदेश

Harbhajan Singh : हरभजन सिंह भाजपाच्या वाटेवर, कार्यकर्ते संतापले, घराच्या भिंतीवर लिहिले गद्दार, पाहा व्हिडिओ

Harbhajan Singh BJP : आपचे ७ राज्यसभा खासदार भाजपमध्ये गेल्यामुळे राजकीय वाद पेटला असून कार्यकर्त्यांनी हरभजन सिंह यांच्या घराबाहेर ‘गद्दार’ असे लिहून निषेध व्यक्त केला आहे.

Namdeo Kumbhar

राघव चड्ढा यांच्यासह ७ राज्यसभा खासदारांनी आप पार्टीला रामराम ठोकला असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झालेय. राघव चड्ढा यांच्यासह ३ जणांनी शुक्रवारीच भाजपात प्रवेश केला आहे. हरभजन सिंह आप पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार आहे, त्यामुळे पंजाबमधील आप कार्यकर्ते संतापले. हरभजन सिंह याच्या जालंधर येथील घराबाहेर कार्यकर्त्यांनी गद्दार असे लिहिलेय. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पंजाबचे राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांनी शुक्रवारी राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. आपच्या १० राज्यसभा खासदारांपैकी ७ खासदार भाजपमध्ये सामील झाले. दरम्यान, अशोक मित्तल यांच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या गेटवर गद्दार असे लिहिण्यात आले आहे. याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हरभजन सिंह आणि अशोक मित्तल यांच्याविरोधात पंजाबमधील जनता नाराज असून रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला जात आहे. हरभजन सिंह याच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहण्यात आलेय. सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी रोखल्यानंतरही आप कार्यकर्त्यांनी भिंतीवर गद्दार लिहिलेच. भिंतीवर काळ्या स्प्रे-पेंटने इंग्रजी आणि पंजाबीमध्ये 'गद्दार' लिहिले.

हरभजन सिंह याच्यासारखेच अशोक मित्तल यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. अशोक मित्तल यांच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या गेटबाहेर 'आप'चे शेकडो कार्यकर्ते जमले. कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या गेटवर काळ्या स्प्रे पेंटने 'पंजाबचा गद्दार' असे लिहिले. या राज्यसभा खासदारांनी 'आप' सोडल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते खूप संतप्त झाले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपला पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, या लोकांनी पंजाबच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि त्याचा विश्वासघात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT