Israel - Hezbollah War Saam Tv
देश विदेश

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Israel - Hezbollah War : हिजबुल्लाहने अलीकडे लेबनानमधून उत्तर इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले होते. त्यानंतर लेबनानमध्ये पेजर ब्लास्ट झाले होते. मुळात अचानक लेबनॉनमध्ये इस्त्रायलने का हल्ले केले. काय कारणं आहेत मोसाद विरुद्ध मुस्लीम संघर्षाची, जाणून घेऊ...

Satish Kengar

इस्त्राईल आणि हमास संघर्षात लेबनॉनच्या ‘हिजबोल्ला’ या दहशतवादी संघटनेनं पहिल्यांदाच सक्रिय सहभाग दर्शविला आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेच्या इस्त्रायलवरील हल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हिजबुल्लाहने हमासला साथ देत इस्त्रायलमधील अनेक ठिकाणी गोळीबार केले होते. त्यानंतरच्या काळात या संघटनेने उत्तर इस्त्रायल आणि गोलन टेकड्यांवरील इस्त्रायली तळांना लक्ष्य केले होते. प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलनेही हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर हा पट्टा धुमसतोय.

मोसाद विरुद्ध मुस्लिम आक्रमण वाढण्याची कारणं काय?

इस्राईलला चारही बाजूंनी मुस्लिम देशांचा वेढा आहे. उत्तरेकडील भाग लेबनॉनला लागून आहे. ईशान्येला सीरिया, पूर्वेला जॉर्डन आहे. आग्नेय, नैऋत्येला इजिप्त, दक्षिणेला लाल समुद्र आहे. उत्तर इस्राईलमधील अनेक क्षेत्रांवर लेबनॉनशी मतभेद आहेत. हिजबोल्लाला या भागावरील इस्राईलचा कब्जा अमान्य आहे.

लेबनॉन सीमेपासून जवळ असल्याने हिजबोल्ला गेल्या एक वर्षापासून इस्राईलच्या उत्तरेकडील भागांना सतत लक्ष्य करतोय. या पट्ट्यात काही इस्राईली सैनिकांचाही मृत्यू झालाय.

हिजबोल्लावर हल्ले का?

इस्राईलचे हिजबुल्लासोबतचे वैर अनेक दशकांचे आहे. हिजबोल्लाच्या हल्ल्यांमुळे सुमारे 60 हजार ज्यूंचं उत्तर इस्राईलमधून पलायन केलं. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंकडून उत्तरेकडील भागावर लक्ष केंद्रित केलं. लेबनॉन सीमेवर सुमारे 20 हजार सैनिक तैनात आहेत. उत्तरेकडील रहिवाशांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याचं इस्त्राईलचं उदिष्ट आहे. लेबनॉनमधील हल्ले याच कारवाईचा भाग आहेत.

जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या या युद्धात एकीकडे हमासच्या कैदेत अजूनही 97 इस्रायली ओलीस आहेत तर दुसरीकडे हिजबोल्लाच्या दहशतीमुळे उत्तरेकडील भाग रिकामा झालायं. इतकंच नाही तर येमेनच्या हुथी बंडखोरांची क्षेपणास्त्रे तेल अवीवमध्ये पोहोचल्यावर इस्त्रायलच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं.

या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर इस्राईलने पुन्हा एकदा आक्रमकता दाखवलीये. त्यामुळे गाझाप्रमाणेच लेबनॉनमध्ये लष्करी कारवाईसाठी इस्त्राईल सज्ज आहे. हिजबोल्लासारख्या दहशतवादी संघटनांची पाळमुळं उखडून टाकण्यासाठी इस्त्रायलने चंग बांधलाय. मात्र हिजबोल्लानंही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ असं म्हटलंय. त्यामुळे पुन्हा नरसंहाराची भीती नाकारता येत नाही. मात्र याचे जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडसाद उमटणार हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT