Hamas Released Hostages Saam Tv
देश विदेश

Hamas Released Hostages : मोठी बातमी! हमासने 25 ओलिसांची केली सुटका; थाई आणि इस्रायली नागरिकांचा समावेश

Israel Hamas War मोठी बातमी! हमासने 25 ओलिसांची केली सुटका; थाई आणि इस्रायली नागरिकांचा समावेश

Satish Kengar

Hamas Has Released 25 Hostages after a deal with Israel :

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार हमासने 25 ओलिसांची सुटका केली आहे. या ओलीसांमध्ये 12 थाई आणि 13 इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक लोकांना ओलीस ठेवले होते.

त्यांनी त्यांना गाझा येथे नेले होते आणि नंतर त्यांची सुटका करण्याची अट ठेवली होती. थायलंडच्या पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये लिहिले की, गाझामधून 12 थाई ओलिसांची सुटका करण्यात आली आहे आणि दूतावासाचे अधिकारी त्यांना परत देशात आणण्यासाठी जात आहेत. सुटका करण्यात आलेल्या ओलीसांची नावे आणि इतर तपशील लवकरच कळतील, असे त्यांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इस्रायली न्यूज वेबसाईट i24NEWS च्या वृत्तानुसार, 13 इस्रायली ओलिसांनाही हमासने सोडले असून हमासने त्यांना रेड क्रॉसकडे सुपूर्द केले आहे. सुटका करण्यात आलेले ओलिस रफाह क्रॉसिंगच्या दिशेने जात आहेत. तत्पूर्वी, इस्रायल आणि हमास यांच्यातील करारांतर्गत चार दिवसांचा युद्धविराम शुक्रवारी सकाळी लागू झाला आहे. (Latest Marathi News)

युद्धविरामनंतर या भागात अद्याप एकही चकमक झाल्याची बातमी समोर आली नाही. युद्धविराममुळे गाझामधील 23 लाख लोकांना काही दिलासा मिळाला आहे. तसेच 7 ऑक्टोबरच्या हमास हल्ल्यात पकडलेल्या आपल्या प्रियजनांबद्दल काळजीत असलेल्या इस्रायलमधील कुटुंबांसाठीनाही दिलासा मिळाला आहे.

इस्रायलने म्हटले आहे की, युद्धविराम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हल्ले पुन्हा सुरू करणार. इस्रायलने सांगितले की, युद्धविराम लागू झाल्यानंतर काही वेळातच इंधनाचे चार टँकर आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे चार टँकर इजिप्तमधून गाझा पट्टीत दाखल झाले.

युद्धविरामदरम्यान इस्रायलने प्रतिदिन 1,30,000 लिटर इंधन पुरवण्याचे मान्य केले आहे. गाझाच्या दैनंदिन 10 लाख लिटरपेक्षा जास्त गरजेच्या तुलनेत हा एक छोटासा भाग आहे. गेल्या सात आठवड्यांच्या युद्धात इस्रायलने गाझाला होणारा इंधन पुरवठा रोखला होता. त्याचा वापर हमास लष्करी कारणांसाठी करू शकतो, असा दावा त्यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT