केंद्रीय निवडणूक आयोगातील कारभारामुळे अडचणीत आलेले मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.कारण
20 वर्षे जुन्या भ्रष्टाचार प्रकरणात ज्ञानेश कुमारांची चौकशी करण्याचे आदेश केरळ सरकारनं दिले आहेत. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी चोकशीचे आदेश दिलेल हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात...
2006 मध्ये मलेशियन सिव्हिल इंजिनिअर ली सी बीन यांच्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. ली सी बीन हे केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टअंतर्गत एमसी रोडच्या सुधारणा कामात सहभागी असलेल्या PATI-BEL कंपनीचे प्रतिनिधी होते. बीन यांनी केलेल्या आत्महत्येनंतर सापडलेल्या पत्रात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा आरोप आहे. तसंच, केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट(KSTP) अंतर्गत रस्ते बांधकामाच्या कंत्राटांमध्ये मोठ्या आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप आहे. 2006 मध्ये या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली होती. मात्र, बाहेरील राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे ही चौकशी अर्धवट राहिल्याचा आरोप आहे.
केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी या प्रकरणातील सर्व जुन्या फायली मागवल्या असून, चौकशीत हस्तक्षेप करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेेत.
खरंतर, 2006 मध्ये प्रचंड वादानंतर तत्कालीन PWD विभागाचे सचिव असलेल्या ज्ञानेश कुमारांना पदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र, आता या प्रकरणात नव्याने तक्रार दाखल केलीये. विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये. त्यातच आता केरळ सरकारनं जुन्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यानं कुमार यांच्या अडचणीत मोठी भर पडलीये. पुढील काळात या प्रकरणी ज्ञानेश कुमारांवर कारवाई होणार का याकडे देशाचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.