Gyanesh Kumar Saam TV
देश विदेश

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधातील याचिकेवर दिवाळीनंतर निर्णय, कोर्टाने नेमकं काय घडलं?

Supreme Court On Gyanesh Kumar: सुप्रीम कोर्टात आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १७ नोब्हेंबरपर्यंत पुढे ढकलली.

Priya More
  • ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली

  • ज्ञानेश कुमार प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली

  • सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उत्तर देण्यास दिली १० दिवसांची मुदत

भरत मोहोळकर, मुंबई

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी आणि SIR रद्द करण्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांना उत्तर देण्यासाठी कोर्टाने २ आठवड्यांचा वेळ दिला.

मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर दोन आयुक्त यांचे मत विचारत न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती ज्योयमल्य बागची आणि मोहना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. आता १७ नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार आहे.

इंडिया आघाडीने फॉर्म 6 मधील बदलावरुन निवडणूक आयोगाला घेरले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगत नोटीस जारी केली. निवडणूक आयोगाने (ECI) ऑनलाइन 'फॉर्म ६' मध्ये केलेले बदल आणि त्यासंदर्भातील प्रेस नोटची प्रक्रिया पारदर्शक नाही, असा युक्तिवाद केला. तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार डोला सेन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील डॉ. मेनका गुरुस्वामी यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रात (Affidavit) SIR चे समर्थन करताना सर्व निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आल्याचे आणि 'फॉर्म ६' मध्ये कोणताही कायदेशीर बदल केला नसल्याचे म्हटले होते.

मुख्य याचिकाकर्ते (राकेश कुमार सिंह) यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्राला उत्तर दाखल करण्यासाठी वेळेची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना उत्तर दाखल करण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिला आहे. तसेच निवडणूक आयोगालाही इतर याचिकांवर आपले सविस्तर उत्तर दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. ​या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. आता या सुनावणीत काय होते हे पाहणे महत्वाचे राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hill Station : स्वच्छ आकाश, थंडगार हवा अन् मनमोहक सूर्यास्त; नोव्हेंबरमध्ये आवर्जून भेट द्या 'या' सुंदर हिल स्टेशनला

Milk Or Paneer: दूध आणि पनीर खरे आहे की बनावट? घरीच ओळखा या 4 सोप्या टिप्सने

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात तलवारीने वाढदिवसाचा केक कापून रील करणाऱ्या तरुणाला अटक

Dark Underarms Tips: काळपट अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी ७ टिप्स; अशी घ्या काखेच्या त्वचेची काळजी

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगर : ४९४ वैध मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण आघाडीवर तर डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT