ग्वाल्हेरमध्ये १९ वर्षीय पुतण्याने कागदपत्रांमध्ये फेरफार करून काकूसोबत लग्न करण्याचा प्रयत्न केला.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे २४ जून रोजी दोघे फरार झाले.
माहिती अधिकाराद्वारे खरे वय १९ वर्षे असल्याचे समोर आले.
पोलीस तपास सुरू असून समाजात तीव्र खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावशी आणि पुतण्यामधील नातेसंबंध कलंकित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ १९ वर्षांचा तरुण आपल्या २५ वर्षीय मावशीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांची निर्मिती केल्याचे समोर आले आहे. कुटुंबाला आणि कायद्याला फसवून हा तरुण आणि त्याची मावशी सध्या फरार आहेत.
ही घटना शील नगर येथील आहे. रितेश धाकड नावाचा १९ वर्षीय तरुण आपल्या मावशीवर प्रेम करत होता. लग्नासाठी कायदेशीर वयगाठ आवश्यक असल्याने त्याने त्याचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्डमध्ये फेरफार केली आणि स्वतःचे वय दोन वर्षे अधिक दाखवले. त्याचे खरे जन्मवर्ष २००५ असून वय १९ वर्षे होते. पण कागदपत्रांमध्ये वय २१ वर्षे दाखवण्यात आले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे रितेश आणि त्याच्या मावशीने न्यायालयात लग्नासाठी अर्ज दाखल केला आणि २४ जून रोजी घरातून फरार झाले.
कुटुंबाला संशय आल्यानंतर त्यांच्या काकांनी, आकाश सिंग राजपूत यांनी, माहिती अधिकाराद्वारे रितेशची दहावीची गुणपत्रिका मिळवली. त्यातून रितेशचे खरे जन्मवर्ष २००५ असल्याचा पुरावा मिळाला आणि कागदपत्रांमधील २००३ दाखवलेले वर्ष खोटे असल्याचे स्पष्ट झाले. या खुलाशानंतर बहोदापूर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
या घटनेबाबत सीएसपी रॉबिन जैन यांनी सांगितले की, कागदपत्रे खोटी करून फरार झालेल्या या जोडप्याचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापे टाकून तपास सुरू आहे आणि दोघांना लवकरच अटक केली जाईल. या प्रकरणामुळे कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला असून समाजातही तीव्र खळबळ उडाली आहे. स्थानिक स्तरावर या घटनेकडे अवैध नातेसंबंध आणि कायद्याची पायमल्ली म्हणून पाहिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.