Man kills daughter :  Saam tv
देश विदेश

Man kills daughter : पुन्हा सैराटचा थरार! आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीला संपवलं

Man kills daughter in gwalior : देशात पुन्हा एकदा सैराटचा थरार घडला आहे. आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्वालियरमध्ये आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीला संपवल्याची घटना घडली आहे. बापाने पोटच्या मुलीला गळा दाबून संपवलं. ग्वालियरमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या बापाला अटक केली आहे.

मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये सैराटची पुनरावृत्ती घडली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वालियर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीने पोटच्या मुलीला संपवलं आहे. मुलीच्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध होता. मुलगी इतर जातीतील मुलाच्या प्रेमात पडली होती. कुटुंबाच्या विरोधानंतरही मुलगी ही प्रियकराच्या संपर्कात होती. यामुळे शुक्रवारी बाप आणि मुलीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या बापाने शुक्रवारी मुलीची गळा दाबून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलीच्या हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्वालियर पोलिसांनी या हत्ये प्रकरणी तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण?

ग्वालियर शहरातील गिरवाई भागात राहणाऱ्या एका मुलीला प्रेमामुळे जीव गमावण्याची वेळ आली आहे. आंतरजातीय प्रेम केल्याने बापाने मुलीची हत्या केली. मुलीच्या आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील विरोधाला न जुमानता संतापलेल्या बापाने मुलीला संपवलं. बापाने हत्या केल्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला.

१९ वर्षीय तरुणीची ६ महिन्यापूर्वी शिवपुरी येथील तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे १८ वर्षीय तरुणीने कुटुंबासमोर प्रियकरासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, कुटुंबाने मुलीच्या प्रेमाला विरोध केला. बापाने मुलीला समजवलं. मुलगी लग्न करण्याचा हट्टावर कायम होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री बापाने मुलीची हत्या केली. त्यानंतर बाप पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.

पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून मुलीची हत्या केल्याचे कबुल करत अटक करण्यास सांगितलं. यामुळे पोलीस कर्मचारी चकीत झाले. पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घराच्या अंगणात मुलीचा मृतदेह सापडला. मुलीच्या मृतदेहाजवळ तिची आई आणि घरताली इतर सदस्य रडत होते. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णलयात पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वायुसेनेच्या माध्यमातून नीट परिक्षेच्या प्रश्न पत्रिका नागपूरात पोहचल्या

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT