Guwahati hotel firing incident four people killed saam tv
देश विदेश

Firing In Hotel: हॉटेलमध्ये घुसून बेछुट गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, शहरात खळबळ

Gunmen Open Fire Near Hotel: आसामची राजधानी गुवाहाटीतील हॉटेल बिलास इन परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जातंय.

Bharat Jadhav

  • गुवाहाटीतील बोरा सर्व्हिस परिसरात गोळीबाराची घटना

  • या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

  • पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले

आसामची राजधानी गुवाहाटीच्या बोरा सर्व्हिस परिसरात गोळीबाराची घटना घडलीय. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झालाय. तर काही जण जखमी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी शहरातील हॉटेल बिलास इनमध्ये २६ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास बेछुटपणे गोळीबार झाल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. हॉटेलमध्ये आणि परिसरामध्ये मृतदेह आढळून आले आहे. मृतांमध्ये एक तरुणी आणि २ महिलांचा समावेश आहे. गोळीबार करून हल्लेखोर फरार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी गुवाहाटी पोलीस आयुक्त पार्थ सारथी महंत पोहोचले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पोलीस घटनेचा तपास करत आहे.

गुवाहाटीचे पोलीस आयुक्त डॉ. पार्थ सारथी महंता यांनी सांगितले की, बोरा सर्व्हिस परिसरात असलेल्या 'हॉटेल बिलास इन'मध्ये रात्री ९ च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यात सहा जणांना गोळ्या लागल्या, यात पाच जणांचा मृत्यू झालाय. जखमींपैकी एका व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे (FSL) पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे तपास पूर्ण केल्यानंतर, FSL पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळावरून रवाना झाले.

मृत व्यक्तींमध्ये भावंडे, एक मुलगा आणि एका सुनेचा समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेत प्राण गमावलेल्या पाच व्यक्तींची ओळख हेलेना भराली, भुदेव भराली, देबोश्री भराली, रिनिका भराली आणि नारायण दास, अशी पटलीय. हेलेना भराली आणि भुदेव भराली हे बहीण-भाऊ होते. देबोश्री भराली हा भुदेव यांचा मुलगा होता, तर रिनिका भराली ही त्यांची सून होती. अशाप्रकारे, मृतांपैकी चौघे जण एकाच कुटुंबातील होते. पाचवी व्यक्ती, नारायण दास भराली, या कुटुंबाकडे काम करत होती. पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार, तो देखील त्याच गावचा रहिवासी होता ज्या गावचे हे कुटुंब होते. गोळीबारात जखमी झालेली व्यक्तीही त्याच गावातील रहिवासी आहे.

हॉटेलच्या भाडेकरारावरून वाद

पोलीस आयुक्त डॉ. पार्थ सारथी महंता यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हॉटेलच्या भाडेकराराशी संबंधित मालमत्तेचा वाद असल्याचे समोर आले आहे. हॉटेलचे मालक आणि हॉटेल भाड्याने घेणारी व्यक्ती यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. अटक करण्यात आलेला आरोपी, घनकांत गोगोई याने हे हॉटेल भाड्याने घेतले होते. या वादामुळे गोळीबाराची घटना घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrakor Saree Design: लग्नसमारंभात मिळवा रॉयल मराठमोळा लूक! ट्राय करा चंद्रकोर साडीच्या या ७ हटके डिझाइन्स

Maharashtra News Live Update: रायगडच्या माणगावमध्ये घराचा स्लॅब कोसळून दोन कामगार ठार

Government Scheme : सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 2,000 जमा केल्याने मिळतील 11 लाखांहून अधिक रुपये; पाहा संपूर्ण गणित

मुलींच्या खात्यात थेट ₹1 लाख 1 हजार! लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू; पात्रता अन् कागदपत्रे पाहा

या फोटोमध्ये एकूण किती अंडी आहेत? लवकर सांगा, तुमच्याकडे वेळ आहे फक्त १० सेकंद

SCROLL FOR NEXT