MLA Gayatri Devi Husband Attacked Saam Tv
देश विदेश

गणेश पूजा मंडपात फायरिंग अन् हाणामारी; भाजप महिला आमदार अन् तिच्या पतीवर हल्ला, नेमकं काय घडलं?

MLA Gayatri Devi Husband Attacked: सीतामढी जिल्ह्यात गणपती पूजेदरम्यान हाणामारी व गोळीबाराची घटना. आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती रामनरेश यादव थोडक्यात बचावले.

Bhagyashree Kamble

  • सीतामढी जिल्ह्यात गणपती पूजेदरम्यान हाणामारी व गोळीबाराची घटना.

  • आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती रामनरेश यादव थोडक्यात बचावले.

  • पूजा समितीचे सचिव प्रीतम कुमार प्यारे गंभीर जखमी झाले.

  • पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत तपास सुरू केला आहे.

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात गणपती पुजेदरम्यान मंडपात भयंकर घडलं. मंडपात जोरदार हाणामारी आणि गोळीबाराचा प्रकार घडला. या घटनेत परिहारच्या आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती रामनरेश थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बाबा परिहार ठाकूर मंदिर परिसरात गणपती उत्सवानिमित्त पुजेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, हा भयंकर प्रकार घडला.

यादरम्यान, मंडपात जोरदार हाणामारी झाली. नंतर गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. हाणामारीनंतर मंडपात काहीकाळ गोंधळ उडाला होता. मात्र, मंडपात गोळीबार झालं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ही भयंकर घटना आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती माजी आमदार रामनरेश यादव यांच्या उपस्थितीत घडली आहे. या घटनेत दोघेही थोडक्यात बचावले आहेत.

नेमकं घडलं काय?

रविवारी सायंकाळच्या सुमारास पुजा समितीच्या काही सदस्यांमध्ये आणि इतर लोकांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला होता. त्यावेळी हे प्रकरण मिटवण्यात आले. रात्री आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती माजी आमदार रामनरेश यादव पूजा मंडपात आयोजित जागरण कार्यक्रमात पोहोचले.

उद्घाटनानंतर गायत्री देवी, त्यांचे पती आणि पूजा समितीचे सचिव प्रीतम कुमार प्यारे इतर लोकांसह मंडपातून बाहेर पडत होते. यानंतर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. दरम्यान, कुणालाही गोळी लागलेली नाही. यानंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून प्रीतमला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात प्रीतम गंभीर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा समितीच्या सदस्यांमध्ये आणि अज्ञात लोकांमध्ये झालेल्या भांडणात एक जण जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. तपास झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलं? घाबरू नका, २ मिनिटांतच मिळवा आधार क्रमांक; फक्त फोलो करा या स्टेप्स

मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT