Gujrat crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : भयानक! गर्लफ्रेंडची हत्या करणाऱ्या बॉयफ्रेंडचाही मृत्यू, पोलिसांसमोरच आला हार्ट अटॅक

Gujrat Crime News : गुजरातमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • लिव्ह-इन रिलेशनशिपमधील भांडणातून प्रेयसीची हत्या

  • आरोपीला अटक झाल्यानंतर तुरुंगात ठेवण्यात आलं

  • पहाटे आरोपीला अचानक हृदयविकाराचा झटका

  • आरोपीचा उपचारांपूर्वीच मृत्यू

गुजरातमधील एका तरुणाने आपल्या २० वर्षीय लिव्ह ईन पार्टनरला जीवे मारलं. याप्रकरणी या तरुणाला अटक करण्यात आली होती. मात्र शिक्षा भोगत असताना त्याला हृदयाचा झटका आल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला. नरेंद्र सिंग ध्रुवेल असं या मृत तरुणाचं नाव आहे. दरम्यान त्याच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना गुजरातमधील सौराष्ट्रातील सिरेमिक कारखान्यातील कामगार निवासस्थानात घडली. आरोपी तरुण आणि पीडित मुलगी गेले कित्येक महिने प्रेमसंबंधात होते. याशिवाय ते एकाच घरात राहायचे, मात्र त्या दोघांनी लग्न केलं नव्हतं. काही कारणास्तव या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणातून आरोपीला राग अनावर झाला.

त्याने पीडितेला, लाकडी काठी आणि पट्ट्याने काळ निळं होईपर्यंत बेदम मारलं. त्यानंतर क्रूरतेने तिच्या तोंडाचा चावा घेतला. या हाणामारीत तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्र वेगाने फिरवत तरुणाला बेड्या ठोकल्या शिवाय मृत तरुणीचा मृत्यू शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा होत्या, तसेच तिचा अमानुष छळ करण्यात आला होता. या गुन्ह्याची कबुली देताना तरुणाने सांगितलं की, त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणातून त्याने प्रेयसीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. आरोपी तरुणाच्या जबाबानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली.

गेले कित्येक दिवस शिक्षा भोगत असलेल्या तरुणाला रविवारी पहाटे अचानक हृदयविकाराचा झटका आला. वेदना जाणवू लागल्याने तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा जागीच अपघाती मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने तुरुंगाच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT