Rajkot Game Zone Fire Video Saam Tv
देश विदेश

Rajkot Game Zone Fire Video: राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये आग कशी लागली?, CCTV फुटेज पाहा!

Rajkot Game Zone Fire Latest Update: राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये आग कशी लागली, याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये आग लागल्यामुळे जवळपास ३५ जणांचा मृत्यू झालाय. आता नेमकी ही आग कशामुळे लागली, असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात एक सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे. गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे. वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, घटनास्थळी वेल्डिंगचं काम सुरू होतं. तेव्हा एक ठिणगी प्लास्टिकच्या ढिगाऱ्यावर पडली. तिचं रुपांतर भीषण आगीत झालंय. अगदी थोड्याच वेळात आगीनं भीषण रूप धारण केलं (Rajkot TRP Game Zone Fire CCTV) होतं. तेथील कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना यश मिळालं नाही. काही क्षणांमध्ये संपूर्ण गेमिंग झोन जळून खाक झाल्याचं समोर आलंय.

हा व्हिडिओ @ians_india या X अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. १ मिनीट आणि ३६ सेकंदाचा हा व्हिडिओ दिसत आहे. फायबर आणि गेमिंग झोनमध्ये असलेल्या पेट्रोलमुळे ही आग (Rajkot Game Zone Fire Update) जास्त भडकल्याचं सांगितलं जात आहे. गेमिंग झोनमध्ये दुरूस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी वेल्डिंगचं काम करताना ही आग भडकली. आगीत अडकलेल्या लोकांचा जळून कोळसा झाला होता. घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केल्याचं समोर आलं आहे.

गुजरातच्या राजकोटमध्ये टीआरपी गेमिंग झोनमध्ये २५ मे रोजी भीषण अग्नीतांडव झालं. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी गेम झोनच्या मालकास आणि व्यवस्थापकास सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक (Rajkot Game Zone Fire Video) केली आहे. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. गेमिंग साइटवर लागलेल्या आगीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. वेल्डिंग काम करताना आग भडकल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

राजकोट टीआरपी गेमिंग झोन आग प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई (Gujrat News) केली आहे. याप्रकरणी सरकारने सहा अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या दौऱ्यानंतर सरकारनं ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT