Rajkot man collapses after yoga session Saam Tv News
देश विदेश

योग केंद्रातून बाहेर येताच छातीत कळ; पायऱ्यांवर आला हार्ट अटॅक, जागीच मृत्यू; CCTV व्हायरल

Rajkot man collapses after yoga session: राजकोटमध्ये ५२ वर्षीय व्यक्ती योगा सत्रानंतर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हा क्षण सीसीटीव्हीत कैद झाला असून, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

  • राजकोटमध्ये योगा सत्रानंतर ५२ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

  • मृत व्यक्ती राजेंद्र सिंह यांचा मृत्यूपूर्वीचा क्षण सीसीटीव्हीत कैद.

  • पायऱ्या उतरल्यावर छातीत कळ येऊन खुर्चीवर बसताना ते कोसळले.

देशभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. अशातच एक हृदयद्रावक घटना गुजरातच्या राजकोट शहरातून समोर येत आहे. एका ५२ वर्षीय व्यक्तीला योग केंद्रातून परतल्यानंतर अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध पडताच त्यांना रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राजेंद्र सिंह यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

राजेंद्र सिंह (वय वर्ष ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते गुजरात येथील राजकोटमधील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी ते योग केंद्रात गेले होते. मात्र, पायऱ्या उतरत असताना त्यांना दम लागला. त्यांच्या छातीत अचानक जोरात कळ मारली. त्यांनी खुर्चीचा आधार घेतला आणि त्यावर बसले. मात्र, तीव्र वेदनेमुळे ते खाली कोसळले. यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याची माहिती मालवीय पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने रूग्णालयात धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, राजेंद्र सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

नेमकं घडलं काय?

ओम वेलनेस सेंटरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी ८:०९ वाजता राजेंद्र सिंह पायऱ्यांजवळील खुर्चीवर बसताना दिसतात. ते दीर्घ श्वास घेताना आणि छातीवरून हात फिरवताना दिसतात, यावरून त्यांना असह्य वेदना होत असल्याचं स्पष्ट होतं. सकाळी ८:०९ वाजून ४५ सेकंदांनी ते खुर्चीवर बसतात आणि नक्की २ मिनिटे ५ सेकंदांनी, म्हणजे ८:१२ वाजता, ते अचानक खाली कोसळतात. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं गेलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT