Gujrat  Saam TV
देश विदेश

Gujrat Election Result: पराभव समोर दिसताच काँग्रेस उमेदवाराने उचललं टोकाचं पाऊल, मतमोजणी केंद्रावर एकच धावपळ

काँग्रेसचे उमेदवार भरतभाई वेलजीभाई सोलंकी यांनी निवडणूक आयोगावर मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gujrat Election Result 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. यात भाजप गुजरातमध्ये सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसचे उमेदवार भरतभाई वेलजीभाई सोलंकी यांनी मतमोजणीदरम्यान गांधीधाम मतदारसंघ येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. (Election 2022

काँग्रेसचे उमेदवार भरतभाई वेलजीभाई सोलंकी यांनी निवडणूक आयोगावर मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संतापलेल्या सोलंकी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. (Latest Marathi News)

गुजरात विधानसभा निवडणुकीत गांधीधामची जागा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या एक दशकापासून ही जागा भाजपकडे आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार मालती माहेश्वरी यांनी काँग्रेसच्या किशोर पिंगोल यांचा सुमारे 20,000 मतांनी पराभव केला. यावेळी भाजपने पुन्हा विद्यमान आमदारांना तिकीट दिलं आणि काँग्रेसच्या भरतभाई सोलंकी यांच्या विरोधात रिंगणात उतरवले.

सोलंकी यांनी मतदानादरम्यान ईव्हीएम नीट सील केलेले नसून अनेकांच्या स्वाक्षऱ्याही नसल्याचा आरोप केला. त्यांनी फसवणुकीचा आरोप केला. मतमोजणी सुरू होताच सोळंकी यांनी धरणे धरून बसले, मात्र त्यांचे कुणीच ऐकले नाही. यानंतर रागाच्या भरात सोलंकी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दुपारी 2 वाजेपर्यंत भाजपला 156 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस 18 आणि आम आदमी पार्टी फक्त 5 वर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT