Gujrat Bus Accident: Gujrat Bus Accident:
देश विदेश

Gujrat Road Accident: मोठी दुर्घटना! डिवायडर तोडून भरधाव बसची वाहनांना धडक; चार चिमुकल्यांसह ७ जण ठार

Gujrat Bus Accident: या अपघातात प्राण गमावलेले सहा प्रवासी मिनी व्हॅनमधून प्रवास करत होते. त्याचवेळी बसमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांची ओळख पटली आहे.

Gangappa Pujari

Gujrat Dwarka Road Accident:  गुजरातमधील द्वारका येथे शनिवारी रात्री एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये चार मुलांसह सात जणांना आपला जीव गमवावा लागला, तर १४ जण गंभीर जखमी झाले. भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली तसेच तीन वाहनांना जोराची धडक दिली. या दुर्घटनेत सात जमांचा मृत्यू झाला असून १४ जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या राष्ट्रीय महामार्ग 51 वर शनिवारी (28 सप्टेंबर) सायंकाळी 7.45 च्या सुमारास हा अपघात झाला. द्वारकाहून अहमदाबादच्या दिशेने एक बस जात होती. रस्त्यावर अचानक जनावरे आल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला. जनावरांना वाचवताना बस दुभाजकावर आदळली. महामार्गावर वेग जास्त असल्याने बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये आली आणि समोरून येणाऱ्या तीन वेगवान वाहनांना धडकली.

या बसने मिनी व्हॅन, कार आणि एका मोटारसायकलला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की त्यामध्ये सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात प्राण गमावलेले सहा प्रवासी मिनी व्हॅनमधून प्रवास करत होते. त्याचवेळी बसमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांची ओळख पटली आहे.

तान्या (वय, २ वर्ष) रियांश (वय, ३ वर्ष) विशान (वय,७ वर्ष) प्रियांशी (वय, १३ वर्ष) हेतलबेन ठाकेर (वय,२५) चिराग राणाभाई (वय, २५) आणि भावनाबेन ठाकोर (वय,३५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दुर्दैवी घटनेत चार चिमुकल्यांसह सात जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा 'हे' हेल्दी पुडिंग, वजन कमी करण्यासाठी ठरेल फायदेशीर

Crime news: पत्नीचं दुसरीकडे अफेअर, पतीची दिली सुपारी; नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजून प्रियकराला केले १०० पेक्षा जास्त फोन आणि...!

Maharashtra News Live Update: रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

SCROLL FOR NEXT