Gujrat crime news  Saam Tv
देश विदेश

Gujrat Crime News : पत्नी, मेहुण्याने जबरदस्ती बिफ खायला घातलं, पतीने आयुष्य संपवलं

नैराश्यात गेलेल्या पत्नी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

साम टिव्ही ब्युरो

Gujrat Crime News : पत्नी आणि मेहुण्याने जबरदस्ती बिफ खायला घातलं. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या पतीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गुजरातमधील (Gujrat) सूरत शहरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मृत तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास देखील सुरू केलाय.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, सूरत शहरातील रोहित सिंग नामक एका विवाहित तरुणाने काही महिन्यांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. रोहितच्या आईने त्याच्या आत्महत्येला रोहितची पत्नी सोनम अली आणि त्याचा मेहूणा मुख्तार अली याला जबाबदार धरलं होतं. रोहितच्या आईने आरोप केला होता की, या दोघांनी त्याला जबरदस्तीने बिफ खाऊ घातलं. त्यानंतर तो नैराश्यात गेला आणि या नैराश्यातूनच त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. (Gujrat Todays News)

रोहित आणि सोनमचा झाला होता प्रेमविवाह

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित सिंग आणि सोनम अली यांचा वर्षभरापूर्वी प्रेमविवाह झाला होता. दोघेही सोबत एका मिलमध्ये काम करत असल्याने त्यांच्यात जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. रोहितने आपल्या प्रेमाची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा लग्नास विरोध होता. घरच्यांच्या नाराजीनंतरही रोहितने सोनम अलीशी लग्न केले आणि वेगळे राहू लागला. यानंतर रोहितच्या कुटुंबीयांनी त्याच्यासोबत असलेले सर्वच संबंध तोडले. (Gujrat Crime News)

जूनमध्ये संपवली जीवयात्रा

दरम्यान, पत्नी सोनम अली आणि मेहुणा मुख्तार अली यांनी बळजबरीने बिफ खाऊ घातल्यानंतर आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर रोहित सिंगने 27 जून रोजी आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह पंख्याला दुपट्ट्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर सोनम आणि तिच्या कुटुंबीयांनी रोहित सिंगचा अंत्यसंस्कार केला आणि मृताच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली नाही. (Surat Todays News)

रोहितने लिहली होती फेसबुक पोस्ट

आत्महत्या करण्यापूर्वी रोहित सिंगने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. बिफ खाण्यास नकार दिल्याने पत्नी आणि मेहुण्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोघांनीही जबरदस्तीने मला बिफ खाण्यास प्रवृत्त केलं. म्हणून मी इतका टोकाचा निर्णय घेत आहे. अशी फेसबुक पोस्ट रोहितने लिहली होती. काही महिन्यांनंतर, रोहितच्या भावाला त्याच्या मित्रांमार्फत फेसबुक पोस्टची माहिती मिळाली. यानंतर रोहित सिंगच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. रोहितची आई वीणा देवी सांगतात की, रोहित आणि सोनमचं लग्न झाल्याचं तिला माहिती नाही. मात्र, दोघांनी एकत्र काम केले.

दरम्यान, रोहितच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहितची पत्नी सोनम अली आणि मेहुणा मुख्तार अली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT