FAKE FILM PRODUCER ARRESTED FOR RAPE OF MINOR IN GUJARAT 
देश विदेश

Shocking: भयानक घटना! सिनेमात काम देण्याचं आमिष, १५ वर्षाच्या मुलीला ड्रग्ज दिले, १८ महिने बलात्कार

Gujarat Crime News: राजकोट येथे चित्रपट निर्माता असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाला १५ वर्षीय मुलीवर दीड वर्ष अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhanshri Shintre

  • १५ वर्षीय मुलीवर चित्रपट भूमिकेचे आमिष दाखवून दीड वर्ष अत्याचार.

  • २५ वर्षीय खोटा चित्रपट निर्माता राजकोट पोलिसांच्या ताब्यात.

  • इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे मुलीला जाळ्यात ओढण्यात आले.

  • आरोपीवर पोक्सो आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल.

गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका देण्याचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय मुलीवर दीड वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. स्वत:ला चित्रपट निर्माता असल्याचा त्याचा दावा असून, त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीने विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारीनुसार, २ वर्षांपूर्वी मुलीला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट दिसली होती. त्या पोस्टमध्ये गुजराती चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या लोकांना संधी देण्याचे सांगण्यात आले होते. या पोस्टमधील संपर्क क्रमांकावर कॉल करून ती मुलगी आणि तिची आई राजकोटमधील साधू वासवानी रोडवरील आरोपीच्या कार्यालयात गेल्या. त्यानंतर आरोपीने तिला ऑडिशनसाठी बोलावले. अभिनय कौशल्य वाढवण्यासाठी सराव करावा लागेल असे सांगितले. मुलगी अभिनय चांगल्या पद्धतीने करत असेल तर तिला प्रमुख भूमिका देण्याचे त्याने आश्वासन दिले, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.

एका प्रशिक्षण सत्रादरम्यान आरोपीने तिला इंटिमेट सीन करण्याची मागणी केली. त्यानंतर तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तसेच किस घेण्याचा प्रयत्न केला. मुलीने यावर विरोध केला आणि सरावासाठी जाण्यास नकार दिला. मात्र आरोपीने तिच्या आईला फोन करून पुन्हा येण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपीने तिला इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाच्या नावाखाली पुन्हा कार्यालयात बोलावले. तिला वारंवार मद्यपानाचे ड्रिंक देऊन अत्याचार केला. पुढील १८ महिन्यांमध्ये त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. चित्रपटांमध्ये काम न देण्याची धमकी देऊन आरोपीने तिला गप्प बसण्यास भाग पाडले होते.

या प्रकरणी तपास अधिकारी हरेश पटेल यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बालक लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

सांगलीमध्ये पुन्हा राजकारण तापलं; जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात पॉलिटिकल वाॅर, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

Satyajeet Tambe: सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार का? विखे-पाटलांना नो इश्यू! आता थोरात मामांनीही केलं क्लिअर

Government Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; पगार १.७७ लाख; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT