XE Variant Saam Tv
देश विदेश

Covid 19 XE Variant: देशात नव्या व्हेरियंटचा शिरकाव, गुजरातमध्ये पहिला रुग्ण

पाच राज्यांसाठी अॅलर्ट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशातील करोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र असतानाच, कोरोनाच्या (Covid 19) नव्या व्हेरियंटचं संकट घोंघावत आहे. रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये कोरोनाचा एक्सई (covid 19 XE) व्हेरियंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. जगभरात जवळपास ६०० जणांना कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटनं शिरकाव केला असून, पहिला रुग्ण गुजरातमध्ये सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं (Central Government) खबरदारी म्हणून पाच राज्यांना 'अॅलर्ट' केलं आहे. केंद्राच्या आरोग्य विभागानं महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम सरकारशी यासंबंधी पत्रव्यवहार केला असून, करोनाच्या नवीन रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.

हे देखील पहा -

ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक घातक नाही

रिपोर्टनुसार, केंद्रीय आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुजरातमध्ये कोरोना विषाणूचा नवीन एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. या राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा जास्त घातक नाही. मात्र, तरीही ही चिंतेची बाब आहे.

पाच राज्यांसाठी अॅलर्ट

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य मंत्रालयानं पाच राज्यांसाठी 'अॅलर्ट' जारी केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम सरकारला यासंबंधी पत्र पाठवले असून, कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत खबरदारी घेण्यास सांगितले आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवतानाच, गरज भासल्यास राज्य सरकारांनी कोविड १९ संबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, असेही सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

SCROLL FOR NEXT