Gujarat Accident News AI Images
देश विदेश

Accident News : ट्र्क आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; भीषण अपघातात ७ कामगारांचा मृत्यू,२० जण गंभीर

Gujarat Truck Pickup Accident News : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खावडा येथे ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन सात कामगारांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी तपास सुरू.

Alisha Khedekar

  • गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खावडा परिसरात भीषण अपघात

  • ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक

  • या दुर्घटनेत सात कामगारांचा मृत्यू , २० जण गंभीर जखमी

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खावडा परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. ट्रक आणि पिकअप यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन सात कामगारांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

नेमका अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान खावडा परिसरात हा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या पिकअपमधून कामगार प्रवास करत होते. धडकेनंतर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि काही कामगार वाहनाच्या आत अडकले. या दुर्घटनेत ७ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

७ कामगारांचा मृत्यू

खावडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. बी. चावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ७ कामगार पिकअपच्या ढिगाऱ्यात अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. मात्र, या सातही कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात २० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांकडून तपास सुरू

या भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ट्रक आणि पिकअपची समोरासमोर धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा शोध घेतला जात आहे. अपघातामागे कोणाचा निष्काळजीपणा होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत. खावडा परिसर हा सोलार प्रकल्पाचा भाग आहे. अशा ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या दुर्घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Pillow Benefits : पायांच्या मध्ये उशी ठेवून झोपण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, शरीरात वेदना कधी जाणवणारच नाही

Chocolate Cold Coffee: सुट्टीच्या दिवशी लहान मुलांसाठी घरीच बनवा कॅफेस्टाईल चॉकलेट कोल्ड कॉफी, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई! संसद मार्ग परिसरातून अनेकांना घेतले ताब्यात; राजधानीत तणाव वाढला

मोठी बातमी! २ प्रमुख योजना कायमच्या बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय, काय आहे मुख्य कारण?

DA Hike Update: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ; आता थेट 'इतका' वाढून मिळणार पगार

SCROLL FOR NEXT