गुजरातच्या भरूचमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला
सायखा जीआयडीसीतील सिनझील फार्माकेम कंपनीत ही घटना घडली
केमिकल कंपनीतील स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू
जखमी झालेल्या कामगारांची प्रकृती चिंताजनक
गुजरातमध्ये केमिकलच्या कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरूच जिल्ह्यातील वागरा येथील सायखा जीआयडीसीमधील सिनझील फार्माकेम या कंपनीत ही स्फोटाची घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये ५ कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी आहेत.
या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. केमिकल कंपनीत झालेला स्फोट इतका भयंकर होता की आसपासचा परिसर हादरून गेला. अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे आवाज ऐकू आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या केमिकलच्या कंपनीत हायड्रोजनीकरण प्रक्रिया सुरू होती. याचदरम्यान अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की, मशीनचे अनेक तुकडे झाले. या मशीनचे तुकडे दूरवर फेकले गेले. स्फोटाच्या आवाजामुळे जवळच्या इतर कंपन्या आणि रहिवासी भागामध्ये भीतीचे वातावरण होते. स्फोट होताच नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.
या भीषण स्फोटात कंपनीमध्ये काम करणारे ५ कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या २ कामगारांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाची वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. केमिकलची कंपनी असल्यामुळे आगीचा भडका उडाला. आगीने रौद्ररुप धारण केले होते. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळावे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.