Gujarat Bahraich Bus Truck Accident  Saam TV
देश विदेश

Bus Accident News: सुसाट लक्झरी बस ट्रकला धडकली; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Gujarat Bus Accident News: प्रवाशांनी खचाखच भरलेली सुसाट बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Gujarat Bahraich Bus Truck Accident

क्रिसमसनिमित्त सलग सुट्ट्या असल्याने अनेकजण आपल्या परिवारासह पर्यटनस्थळी फिरण्यासाठी जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असून अपघातांच्या घटना देखील घडत आहेत. अशातच गुजरामधून एक भयानक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली सुसाट बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या भीषण अपघातात (Bus Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त लक्झरी बस गुजरातमधील (Gujarat News) राजकोट येथून सुमारे ६० प्रवाशांना घेऊन बलरामपूरच्या दिशेने निघाली होती. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोतवाली देहाट परिसरात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् क्षणार्धात बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता, की बस आणि ट्रकचा अक्षरश: चक्काचूर झाला या अपघातात ट्रकचालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी बचावकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

पर्यटन परवान्यांच्या नावाखाली जिल्ह्यातील विविध मार्गांवर अनेक राज्यांमध्ये बसेस चालवल्या जातात आणि त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात. गुजरातमध्येही गेल्या काही दिवसांपासून लक्झरी बसेस सुसाट धावत आहेत. या बसेवर आरटीओने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची उद्योगावर दुष्काळाचे सावट

Maharashtra Politics: आपापसातले मतभेद सोडून द्या, एकत्र राहा; एकनाथ शिंदेचं महायुतीच्या एकीवर मोठं विधान

Maharashtra Drought : राज्यात दुष्काळाचे संकट गडद! शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, सोलापूरसह धाराशिवला तातडीने मदत देण्याची मागणी

Gold Price Today: १० दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे ताजे दर पाहा

Best Oil For Frying Puri: सणासुदीला पुऱ्या तळण्यासाठी कोणते तेल वापरावे? हे ५ पर्याय ठरतील आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT