Bus And Truck Accident In Gujarat Saam Tv
देश विदेश

Gujarat Accident: महाराष्ट्रातून राजस्थानला जाणाऱ्या प्रवासी बसला भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू

Bus And Truck Accident In Gujarat: गुजरातमधील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. गुजरातच्या आनंद जिल्ह्यात अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक होऊ झालेल्या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बस महाराष्ट्रातून राजस्थान येथे जात होती. त्याचवेळी या बसला आनंद जिल्ह्यातील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला. अपघाताची ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच, गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. जखमींमधील ३ जणांचा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये एकूण ६ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हा अपघात झाला तेव्हा लक्झरी बस पंक्चर झाली होती. त्यामुळे बस हायवेच्या बाजूला उभी होती. चालक, क्लिनर आणि प्रवासी बसखाली उभे होते. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच आनंद अग्निशमन दल, एक्स्प्रेस हायवे पेट्रोलिंग पथक आणि आनंद ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT