Murlidhar Mohol: पुण्याला 28 वर्षांनी मंत्रिपद; पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळांना लॉटरी

Murlidhar Mohol: पुण्याच्या मैदानातील कसलेला पैलवान अशी ओळख असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभेचं मैदान मारलं. मात्र पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर थेट केंद्रीय मंत्रिपदावर धडक मारली. मोहोळांना मंत्रिपद देण्यामागचं कारण काय यावरचा हा विशेष रिपोर्ट
Murlidhar Mohol: पुण्याला 28 वर्षांनी मंत्रिपद; पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळांना लॉटरी
Murlidhar Mohol
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

पुण्याचं मैदान मारल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळ यांना थेट मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. सुरेश कलमाडी यांच्यानंतर तब्बल 28 वर्षांनी पुणे शहराला मोहोळ यांच्या रुपाने मंत्रिपद मिळालंय. राज्यात पुणे लोकसभा ही सर्वात लक्षवेधी लढत ठरली. विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात झालेल्या या लढतीत मोहोळ यांनी तब्बल 1 लाख 23 हजार मतांनी धंगेकरांचा पराभव केला. अत्यंत प्रतिष्ठेचं असलेल्या पुण्याचं मैदान मारल्यामुळे पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपची धुळधाण होत असताना मुरलीधर मोहोळ आणि उदयनराजे यांनी भाजपच्या दोन जागा राखल्या. यात उदयनराजेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत झालेला पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. पुणे शहर आणि जिल्ह्यावर लक्ष देण्याची रणनीती असल्यामुळेच भाजपनं मुरलीधर मोहोळांना संधी दिल्याची चर्चा आहे.

Murlidhar Mohol: पुण्याला 28 वर्षांनी मंत्रिपद; पश्चिम महाराष्ट्रातून मोहोळांना लॉटरी
Modi 3.0 Cabinet: देशात मोदी सरकारच्या ३.० पर्वाला सुरुवात; पहिल्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा षटकार; 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com