हिमाचल प्रदेश - सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. अशा स्थितीत लग्न करणारे अनेकजण आहेत. मात्र, याचदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे रास्ता बंद होता त्यामुळे एका नवरदेवाने अनोखी शक्कल लढवत नवरीला आपल्या घरी आणले. हा नवरदेव चक्क जेसीबी (JCB) मशीन घेऊन नीवरील घेण्यासाठी पोहोचला. लग्नाच्या सर्व विधी सासरच्या घरी पार पडल्या आणि त्यानंतर नवरदेवाने नवरीला आपल्या घरी नेले. ही घटना हिमाचलच्या (Himachal Pradesh) गिरीपार परिसरातील संगडाह गावात घडली आहे.
हे देखील पहा -
नवरदेवाचे वडील जगत सिंग यांनी पुढे जाण्यासाठी जेसीबी मशीनची व्यवस्था केली, ज्यामध्ये नवरदेव, त्याचा भाऊ सुरेंद्र, वडील जगत सिंग आणि छायाचित्रकार यांच्यासोबत 30 किलोमीटरचा प्रवास करून रतवा गावात पोहोचले. तेथे त्यांनी लग्नाचे सर्व विधी पार पाडले आणि नवरीसह घरी परतले.
दरम्यान दुसरीकडे, गिरिपार भागातील गरद्धधर गावातही पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद झाल्यामुळे एका नवरदेवाला आपल्या नवरीला आणण्यासाठी 100 किलोमीटर जादा प्रवास करावा लागला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.